Alto Price In Pakistan: पाकिस्तान सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. पाकिस्तानचे दोन्ही हात आज रिकामे आहेत. परिस्थिती अशी आहे की, लोकांच्या खाण्याचेही वांदे झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. महागाईने रेकॉर्ड तोडला आहे. यावेळी पाकिस्तानमध्ये कारच्या किमतीही पाच पटीने वाढल्या असून महागाईचा कहर असा आहे की, पाकिस्तानमध्ये एका मारुती अल्टोच्या किमतीत तुम्ही भारतात तीन SUV खरेदी करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानात ३.५० लाखाची कार विकली जातेय २७ लाखात

पाकिस्तानमध्ये अल्टोची किंमत २१ लाखांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेलची किंमत २७ लाखांपर्यंत जाते. जर आपण ऑन रोड किंमतीबद्दल बोललो तर ते आणखी महाग होते. भारताबद्दल बोलायचे झाल्यास, अल्टोची किंमत बेस मॉडेलसाठी ३.५० लाखापासून सुरू होते आणि टॉप-एंड मॉडेलसाठी ५.१२ लाखांपर्यंत जाते.

(हे ही वाचा : Bullet घ्यायचा विचार करताय? अवघ्या ५० हजारात खरेदी करा ‘ही’ Royal Enfield, अन् करा पैशांची बचत )

मध्यमवर्गीयांसाठी अल्टो बनली ड्रीम कार

अशा परिस्थितीत पाकिस्तानात महागाई का वाढत आहे, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन कमकुवत होणे. सध्या पाकिस्तानी चलनाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घसरले आहे. सध्या २६१.८७ पाकिस्तानी रुपयाचे मूल्य १ यूएस डॉलर इतके आहे. तर भारतात १ डॉलरचे मूल्य ८२.७६ भारतीय रुपयांच्या बरोबरीचे आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू रेकॉर्डब्रेक किमतीत विकल्या जात आहेत. भारताचे चलन पाकिस्तानच्या चलनापेक्षा तिप्पट मजबूत आहे. चलनाच्या घसरत्या मूल्यामुळे अल्टो आता पाकिस्तानातील श्रीमंतांच्या हाताबाहेर गेली आहे. आणि मध्यमवर्गीयांसाठी अल्टो ही आता ड्रीम कार बनली आहे.

मारुती सुझुकीची परवडणारी हॅचबॅक आहे अल्टो

मारुती सुझुकी आपली परवडणारी हॅचबॅक अल्टो भारतात तसेच अनेक देशांमध्ये विकते. पाकिस्तानमध्ये अल्टो सुझुकी ब्रँड अंतर्गत विकली जाते. एकेकाळी ही पाकिस्तानमधील सर्वात किफायतशीर कार देखील असायची. अल्टो भारतात २००० मध्ये लाँच करण्यात आली होती. भारतीय रस्त्यांवर अल्टो ही गाडी २० वर्षांपेक्षा जुनी आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने ३८ लाख युनिट्सची विक्री केली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alto price in pakistan starts from rs 21 lakh while the top model goes up to rs 27 lakh onroad price then it becomes even more expensive pdb