Video: सायकल मुळे बे’चैन’ व्हायचे दिवस गेले! Chainless Cycle चे फीचर व किमंत जाणून घ्या

सायकलचे पॅडल हे थेट सायकलच्या चाकाला जोडलेले आहेत

Video: सायकल मुळे बे’चैन’ व्हायचे दिवस गेले! Chainless Cycle चे फीचर व किमंत जाणून घ्या
Chainless Cycle (फोटो: Twitter)

मै तो सायकल से जा रहा था… भेलपुरी.. तिथे पोहचेपर्यंतच सायकलची वाटेत चैन निघाली आणि रस्त्यातच प्लॅन फिस्कटला. आजवर अनेकदा असा किस्सा आपल्यासोबतही झाला असेल. मात्र आता एक viral video ही चैनची समस्या कायमची सोडवली जाऊ शकते असा दिलासा घेऊन आला आहे. सायकलच्या पहिल्या निर्मिती पासून त्यात अनेक अपडेट झाले. अगदी दोन चाकं ते सहा चाकं हा प्रवास किंवा गिअर ऍड करण्यापासुन ते इलेक्ट्रिक सायकल पर्यंत अनेक बदल आपण पाहिले. मात्र हा नवा अपडेट म्हणजेच विना चैनची सायकल हा भर रस्त्यात चैन निघाल्याने होणारा मनस्ताप नक्की कमी करू शकेल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती विना चैनची सायकल चालवताना दिसत आहे. यात सायकलचे पॅडल हे थेट सायकलच्या चाकाला जोडलेले आहेत. या व्हिडीओ मध्ये पुढे साधारण सायकल व विना चैनची सायकल यातील फरक सुद्धा दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ तानसू येगेन नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे.

पहा विना चैनच्या सायकलची झलक

Optibike R22 Everest: एका चार्जिंग मध्ये 483km धावणार, ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट चे भन्नाट फीचर व किमंत जाणून घ्या

साखळी नसलेल्या सायकलमध्ये, कार्बन-फायबर शाफ्टचा वापर करून चाके पेडलला जोडलेली असतात. शाफ्ट मागील चाक आणि पेडल्सपासून ९० अंश वळते. शाफ्टच्या दोन्ही टोकांवर, कमी-घर्षण सिरेमिक बियरिंग्ज आहेत. हे बेअरिंग्स ड्राईव्ह शाफ्टमधून आणि मागील कॉगवर पेडलिंग करून तयार होणारे टॉर्क (रोटेटिंग फोर्स) शिफ्ट करतात. भारतात सहसा असे मॉडेल्स निवडक कंपनीकडून तयार होतात, या सायकलची साधारण किमंत २५,००० ते ५२, ००० या दरम्यान आहे.

ट्विटर युजरने कॅप्शन मध्ये म्हंटल्याप्रमाणे या चैन नसलेल्या सायकलमुळे कमी मेहनतीत वेगाने जाणे शक्य होईल. तसेच उभ्या पेडलिंगमुळे नितंब, गुडघे आणि सांधेदुखी सुद्धा कमी होऊ शकेल. अशा प्रकारच्या शाफ्टने जोडलेल्या पॅडलच्या सायकल १९८० मध्ये सुद्धा चर्चेत होत्या. सध्याचे हे व्हर्जन त्याचे अधिक यशस्वी मॉडेल आहे असे म्हणता येईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bicycle without chain viral video know features and price of new technology update svs

Next Story
Sportiest Car Ever! 15 ऑगस्टला Ola घेऊन येणार नवी EV; असे असू शकतात लुक व फीचर्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी