नो कॉस्ट इएमआय, शून्य डाउन पेमेंट आणि पाच हजारांचा कॅशबॅक! जाणून घ्या कोणत्या स्कूटरवर मिळतेय ही आकर्षक ऑफर | Buy honda Activa with zero down payment and no cost emi know complete offer | Loksatta

नो कॉस्ट इएमआय, शून्य डाउन पेमेंट आणि पाच हजारांचा कॅशबॅक! जाणून घ्या कोणत्या स्कूटरवर मिळतेय ही आकर्षक ऑफर

दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर अनेक वस्तूंवर मोठी सूट देण्यात येत आहे. त्यातच एका स्कूटरवर देण्यात येणारी सूट चर्चेत आहे.

नो कॉस्ट इएमआय, शून्य डाउन पेमेंट आणि पाच हजारांचा कॅशबॅक! जाणून घ्या कोणत्या स्कूटरवर मिळतेय ही आकर्षक ऑफर
प्रातिनिधिक फोटो

Honda Activa : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर कडुन फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. होंडा ॲक्टिवावर देण्यात आलेली ऑफर सध्या चर्चेत आहे. या स्कूटरवर झिरो डाउन पेमेंट आणि नो कॉस्ट इएमआय ही आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. यासह ही स्कूटर विकत घेतल्यास त्यावर ५ हजार रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे.

या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरला ग्राहकांची पसंती मिळत आहे. या स्कूटरची मागणी लक्षात घेऊन कंपनीने एक महिना आधी याचे प्रीमियम एडिशन लाँच केले होते. ज्यानंतर याची विक्री आणखी वाढली. होंडा ॲक्टिवा १२५, ॲक्टिवा प्रीमियम आणि ॲक्टिवा डीएलएक्स या तिन्ही व्हेरियंटवर ही आकर्षक ऑफर उपलब्ध आहे.

आणखी वाचा : मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी

होंडा ॲक्टिवाचे फीचर्स

  • होंडा ॲक्टिवामध्ये १०९.५ सीसी इंजिन आहे.
  • हे इंजिन ५.७३ ‘केडब्लू’ची पॉवर आणि ८.८४ ‘एनएम’ टॉर्क जनरेट करते.
  • यात ५.३ लीटरची फ्युएल टाकी आहे. त्याचे वजन १०६ किलो आहे.
  • यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
  • या ॲक्टिवाची लांबी १८३३ मिमी, रुंदी ६९७ मिमी आणि उंची ११५६ मिमी आहे. तसेच व्हीलबेस १२६० मिमी आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स १६२ मिमी देण्यात आला आहे.
  • या स्कूटरची एक्स शोरूम किंमत ७५,४०० रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पाच लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Mahindra Thar, जाणून घ्या काय आणि कुठे आहे ऑफर?

संबंधित बातम्या

फक्त ३० हजार रुपयात बजाजची ८९ किमी मायलेज देणारी CT100; कंपनी देतंय गॅरेंटी आणि वॉरंटी
लवकरच लाँच होणार ‘या’ छोट्या कार, बाजारात घालणार धुमाकूळ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात
गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना