Hyundai Grand i10 Nios Era: आपल्या देशात हॅचबॅक कारना मोठी मागणी आहे. या सेगमेंटमधील कारच्या किंमती सर्वांना परवडतील अशा असतात, तसेच या कारचा मेन्टेनन्स देखील फार खर्चिक नसतो. विशेष म्हणजे, या कार उत्तम मायलेज देखील देतात, त्यामुळे या कारना बाजारात तगडी डिमांड असते. हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये कमी किमतीच्या, लांब मायलेज असलेल्या हॅचबॅकपासून ते स्पोर्टी डिझाईन्स आणि प्रीमियम वैशिष्ट्यांपर्यंतच्या कारची विस्तृत श्रेणी आहे. त्यापैकी एक Hyundai Motors ची Hyundai Grand i10 Nios आहे जी त्याच्या वैशिष्ट्ये आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथे आम्ही Hyundai Grand i10 Nios च्या बेस मॉडेलची किंमत, फीचर्स, इंजिन आणि मायलेज सांगणार आहोत आणि त्यासोबत सोप्या फायनान्स प्लॅनच्या तपशीलांसह तुम्हाला ही कार अगदी सहज मिळू शकेल.

Hyundai Grand i10 Nios Era Base Model Price किंमत

Hyundai Grand i10 Nios ची किंमत ५,५३,६०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन-रोड ६,०८,८७३ रुपयांपर्यंत जाते. या ऑन-रोड किमतीनुसार, ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला रु. ६.०९ लाख खर्च करावे लागतील.

(हे ही वाचा: मोठ्या कुटुंबासाठी Maruti Suzuki ची ६ लाखाची ‘ही’ ७ सीटर कार १ लाखात आणा घरी; पाहा कुठे मिळतेय ऑफर )

तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल किंवा एवढी मोठी रक्कम एकत्र खर्च करायची नसेल, तर तुम्ही येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे ५५ हजारांच्या डाउन पेमेंटवर हा हॅचबॅक मिळवू शकता.

Hyundai Grand i10 Nios Era Base Model Finance Plan फायनान्स प्लॅन

तुमच्याकडे ५५,००० रुपये असल्यास, ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या कारसाठी ५,५३,८७३ रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जाच्या रकमेवर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.

Hyundai Grand i10 Nios Era बेस मॉडेलवर कर्जाची रक्कम पास केल्यानंतर, तुम्हाला या कारच्या डाउन पेमेंटसाठी ५५,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा ११,७१४ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy hyundai grand i10 nios base model down payment of 55 thousand but how much will be the monthly emi pdb