टाटा मोटर्सच्या कारना भारतीय बाजारात खूप पसंत केले जाते. टाटाच्या कारची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. टाटा मोटर्सच्या अनेक कार्सला भारतात भरभरून प्रतिसाद मिळत आलेला आहे. परंतु बाजारपेठेत काही काळ वर्चस्व गाजवलेल्या एका कारची विक्री घटली असल्याची माहिती आता समोर आली आहे. ही देशातली सर्वात स्वस्त सेडान कार असून ग्राहकांनी या कारकडे पाठ फिरविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ कारची विक्री घटली

सेडान कार्सच्या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सची टिगोर ही कार खूप लोकप्रिय आहे. ही कार देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप ५ सेडान कार्सपैकी एक आहे. तसेच ही देशातली सर्वात स्वस्त सेडान कार आहे. परंतु वार्षिक आधारावर या कारच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये टाटा टिगोरच्‍या केवळ १,५६३ युनिटची विक्री झाली, तर गतवर्षी ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये ४,००१ युनिटची विक्री झाली होती. म्हणजेच, या कारची विक्री वार्षिक आधारावर ६१ टक्क्यांनी कमी झाली. महिन्या-दर-महिन्याच्या वाढीबद्दल बोलायचे झाले तर तेही केवळ दोन टक्के आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये एकूण १,५३४ युनिट्सची विक्री झाली.

(हे ही वाचा : Hero समोर तगडं आव्हान, टाटाने बाजारात दाखल केली स्वस्तात मस्त सायकल; मिळतोय मोठा डिस्काउंट, किंमत फक्त… )

कारचे फीचर्स

टाटा टिगोर ही ४-स्टार सुरक्षा रेटिंग असलेली सेडान आहे. टिगोरची किंमत ६.३० लाख ते ८.९५ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हे सहा ट्रिममध्ये येते – XE, XM, XZ, XZ+, XMA आणि XZA+. यात १.२-लिटर ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन पेट्रोलवर ८६PS/११३Nm आउटपुट देते. हे CNG पर्यायामध्ये देखील येते.

सीएनजी प्रकार ७३ पीएस पॉवर जनरेट करतो. यात फक्त पेट्रोल इंजिनसह ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय आहे, तर CNG मॉडेल केवळ ५-स्पीड एमटी गिअरबॉक्ससह येतो. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात ७.० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto, Apple CarPlay, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

टाटा मोटर्सने या कारमध्ये ऑटो हेडलाइट्स, रेन सेन्सिंग वायपर्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री आणि ऑटो एसी सारखी वैशिष्ट्ये देखील दिलेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश चाचणीमध्ये याला ४-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले. ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर, EBD सह ABS सारखी वैशिष्ट्ये मानक म्हणून उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car sales there has been a huge decline in the sales of tata tigor sedan on an annual basis pdb