कार निर्माते मारुती सुझुकी लवकरच भारतात आपली इको व्हॅन किंवा MPV लाँच करण्याच्या तयारीत आहे. एका अहवालानुसार, मारुती ईकोचे (Maruti Suzuki Eeco) नेक्स्ट-जनरेशन मॉडल तयार करत आहेत. दिवाळीपूर्वी ही कार लाँच केली जाऊ शकते. मारुती सुझुकीची इको १० वर्षांहून अधिक काळ देशांतर्गत बाजारात विकली जात आहे. आता नवीन अद्यतनांसह, कंपनी नवीन स्वरूप आणि फिचरसह कारला लाँच करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२१-२२ या आर्थिक वर्षात १.०८ लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेलेल्या MPV श्रेणीतील मारुतीचे इको हे सर्वाधिक विकले जाणारे प्रवासी वाहन होते. इकोला कंपनीने २०१० मध्ये लाँच केले होते. ही कार ५-सीटर आणि ७-सीटर अशा दोन्ही प्रकारांमध्ये येते. कारची किंमत एक्स-शोरूम ४.०८ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ५.२९ लाख रुपयांपर्यंत जाते.

(फोटो: Financial Express)

(हे ही वाचा: लवकरच लाँच होणार KIA EV6! ‘या’ १२ शहरांमध्ये बुकिंगसाठी कार असेल उपलब्ध)

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, ही कार दोन प्रकारचे इंजिन पर्याय, पेट्रोल आणि सीएनजी (CNG) सह येईल. १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पहिल्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सीएनजी किट असलेले हे इंजिन ६३पीयेस पॉवर आणि ८५ एनएम टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या मते, या कारचे पेट्रोल व्हेरिएंट १६.१ केएमपीएल मायलेज देते आणि सीएनजी व्हेरिएंट २०.८८केएम/केजी मायलेज देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheapest 7 seater car looks brand new available in cng and petrol ttg