अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करा Datsun redi go, जाणून घ्या ऑफर | datsun redi go under 2 lakh with finance plan read full details of car and offers prp 93 | Loksatta

अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करा Datsun redi go, जाणून घ्या ऑफर

Datsun redi GO ची सुरुवातीची किंमत ३.८४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर ४.९६ लाख रुपयांपर्यंत जाते. पण इथे सांगितलेल्या ऑफर्स वाचून तुम्ही ही कार अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करा Datsun redi go, जाणून घ्या ऑफर
(फोटो- CARWALE)

कार क्षेत्रातील सर्वात कमी बजेट आणि जास्त मायलेज देणारी कार हॅचबॅक सेगमेंटमध्ये आढळते, जो सर्वाधिक पसंतीचा सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या मायलेज कारच्या रेंजमध्ये, आम्ही Datsun redi GO बद्दल बोलत आहोत जी कमी बजेट आणि मोठी मायलेज देणारी कार आहे.

Datsun redi GO ची सुरुवातीची किंमत ३.८४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर ४.९६ लाख रुपयांपर्यंत जाते. पण इथे सांगितलेल्या ऑफर्स वाचून तुम्ही ही कार अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

Datsun redi GO वर उपलब्ध असलेल्या या ऑफर सेकंड हँड वाहनांच्या ऑनलाइन खरेदी आणि विक्रीच्या वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून आल्या आहेत, त्यापैकी तुम्हाला सर्वोत्तम ऑफरची संपूर्ण माहिती येथे मिळेल जेणेकरून तुम्ही कमी बजेटमध्ये चांगली कार खरेदी करू शकाल.

Datsun redi GO वरील पहिली ऑफर DROOM वेबसाइटवरून शेअर करण्यात आली आहे. यात कारचे २०१७ चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे या कारची किंमत १,७४,४९४ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना तुम्ही फायनान्स प्लॅन देखील मिळवू शकता.

आणखी वाचा : Maruti Ignis vs Tata Tiago: किंमत, मायलेज, फिचर्स आणि स्टाईलमध्ये कोणती कार चांगली? जाणून घ्या

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या कारचे २०१६ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. येथे त्याची किंमत १,५०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु यासोबत कोणताही फायनान्स प्लान किंवा ऑफर उपलब्ध नाही.

तिसरी ऑफर CARWALE वेबसाइटवरून आली आहे जिथे त्याचे २०१७ चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे त्याची किंमत १.९५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कारसोबत कोणताही फायनान्स प्लान किंवा ऑफर ठेवण्यात आलेली नाही.

आणखी वाचा : Top 3 Best CNG Cars India: स्टायलिश डिझाईन असलेल्या या टॉप ३ सीएनजी कार, उत्तम फिचर्स आणि मोठी मायलेज देतात

Datsun redi GO वर उपलब्ध ऑफरचे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या कारच्या इंजिनपासून ते मायलेजपर्यंत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

Datsun redi GO मध्ये 999 cc चे इंजिन देण्यात आले आहे, ते ०.८ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 54 PS पॉवर आणि 72 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Datsun redi GO कार 22.0 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2022 at 18:33 IST
Next Story
Maruti Ignis vs Tata Tiago: किंमत, मायलेज, फिचर्स आणि स्टाईलमध्ये कोणती कार चांगली? जाणून घ्या