Flipkart Year End Sale Ather Rizta e-scooter Best Deal : इलेक्ट्रिक टू-व्हीलर वाहन निर्माता एथर एनर्जीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर येत्या २०२५ नवीन वर्षामध्ये किंमती वाढवण्यापूर्वी फ्लिपकार्टकडून खूप कमी वेळात लोकप्रिय झालेल्या एथर रिज्टावर खूप चांगली ऑफर दिली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एथर एनर्जीसाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर एक मोठे यश आहे आणि यामुळे कंपनीने या स्कुटर्सची विक्रीची संख्या वाढवली आहे. रिज्टाची किंमत १.१० लाख रुपयांपासून सुरू होत असून १.४७ लाख याची एक्स शोरूम किंमत आहे. आज आपण इलेक्ट्रिक स्कुटरच्या या ऑफर सेलविषयी जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : Top Auto Launched 2024 : महिंद्रापासून ते होंडापर्यंत… २०२४ मध्ये लाँच झाल्या ‘या’ पाच नवीन गाड्या, तुम्हाला कोणती आवडली सांगा?

u

एथर रिज्टा: बेस्ट डील

फ्लिपकार्ट एंट्री लेव्हल रिज्टा एस ला १.०५ लाखांपेक्षा कमी किंमतीमध्ये देत आहे. ई-कॉमर्स कंपनी ५ हजार रुपयांपेक्षा जास्त विक्रीवर २,५०० रुपयांची सूट देत आहे. तसेच इएमआय (EMI) पर्यायांबरोबर क्रेडिट कार्ड ८, ५०० रूपयांपर्यंत सूट देत आहे. एकूण जवळपास ११ हजार रूपयांची सूट दिली जात आहे.

एथर रिज्टा: स्पेसिफिकेशन और फीचर्स

रिज्टा एस मॉडल २.९ kWh च्या बॅटरी द्वारे कार्य करते. जे ५.७ bhp आणि २२ एनएमचा का टॉर्क देते. एथर कंपनीने दावा केला आहे की ही स्कूटर ८० किलोमीटर प्रति तास अधिक वेगाने पोहचू शकते आणि फक्त ४.७ सेकंदामध्ये ०-४० किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. १२३ किलोमीटरच्या IDC रेंजबरोबर ही स्कूटर 8 तास आणि 30 मिनटांमध्ये पूर्ण प्रकारे चार्ज होऊ शकते आणि ६ तास ३० मिनिटांनी ० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते.

हेही वाचा : स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत

रिज्टा एसमध्ये ३४ लीटरचा विशाल अंडर सीट बूट आहे ज्यामध्ये पर्यायी २२ लीटर फ्रंक स्पेस आहे. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन बरोबर ७ इंचीचा डिस्प्ले लेन्स आहे.
ई-स्कूटर १२-इंचीचा अलॉय व्हील, १३० मिमी ड्रम ब्रेक बरोबर २०० मिमी फ्रंट डिस्क आणि इंडिकेटर सह सर्व एलईडी लाइट्स आहेत. रिज़्टा मध्ये १६५ मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स,७८० मिमीची सीटची उंची आणि ८४० मिमी चा पिलियन सीटची उंची आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart year end sale ather rizta e scooter best deal check price specifications and features ndj