यंदा उन्हाळ्याच्या हंगामात विक्रमी तापमानाने कहर केला. अशा वेळी तुम्ही स्वतःची तसेच तुमच्या कारचीही काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात तुमच्या कारची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण याआधी माहिती जाणून घेतली होती. आज आपण कारच्या टायर्सची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत. बाहेरच्या वाढत्या तापमानात या सोप्या टिप्स पाळल्या तर कारच्या टायर्सचे आयुष्य तर वाढवता येतेच पण उन्हाळ्यात ते पंक्चर होण्यापासूनही वाचवता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • उन्हाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने कारच्या टायरचा दाब हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या मोसमात टायरचा वाढलेला दाब तुमच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो. अशा स्थितीत तुमच्या गाडीचा टायर योग्य दाबावर ठेवा. उन्हाळ्यात १-२ पॉइंट्स कमी हवा सुद्धा प्रभावी ठरते.
  • याशिवाय आजकाल बाजारात कारच्या टायरमध्ये हवेऐवजी नायट्रोजन भरले जाते, ज्यामुळे उन्हाळ्यात कारचे टायर थंड राहते.
  • लक्षात ठेवा गरम हवामानात टायरचा दाब जास्त असल्याने टायर फुटण्याची भीती असते ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून गाडीच्या टायरचे दाब वेळोवेळी तपासत राहावेत.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मागे CE लिहण्याचं कारण काय? जाणून घ्या

  • गाडीच्या टायरचे आयुष्य वाढवायचे असेल तर टायरची जागा सतत बदलत राहा. बाईकच्या विपरीत, कारचे टायर समान आकाराचे असतात. त्यामुळेच ओरत्येक ५ ते ६ हजार किलोमीटरनंतर पुढचे टायर मागे आणि मागचे टायर पुढे असे बदलत राहिल्यात ते जास्त काळ सेवा देतात.
  • खरं तर, कारच्या पुढच्या टायरमध्ये मागील टायरपेक्षा जास्त वजन असते. जेव्हा समोरचे दोन्ही टायर मागील बाजूस बसवले जातात, तेव्हा कारचे चारही टायर सारखेच झिजतात आणि त्यांचे आयुर्मान लक्षणीयरीत्या वाढते.
  • केवळ उन्हाळ्यातच नाही, तर कारच्या टायर्सचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रत्येक ऋतूत योग्य प्रकारचे ड्रायव्हिंग करणे महत्त्वाचे आहे. काहीवेळा आपण नकळतपणे चुकीच्या पद्धतीने किंवा खराब गाडी चालवतो. याशिवाय, आपण खूप वेगाने ब्रेक देखील लावतो ज्यामुळे टायर्सवर अधिक दाब पडतो आणि ते लवकर झिजतात.
  • उन्हाळ्यात, टायर आणि रस्ता दोन्ही गरम असतात, त्यामुळे रबर लवकर झिजते. त्यामुळे जर तुम्हाला कारच्या टायर्सचे आयुष्य वाढवायचे असेल तर तुमची कार आरामात आणि सहज चालवा.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get rid of tyre puncture problems by using these tips the life of the wheels will also increase pvp