भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने भारतात Hero Mavrick 440, Xtreme 125R या दोन नवीन मोटरसायकल लाँच केल्या आहेत. या दोन्ही बाईक्स त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम फीचर्स सह लाँच करण्यात आल्या आहेत. Maverick 440 बद्दल सांगायचे तर, ही मोटरसायकल Harley-Davidson च्या सहकार्याने विकसित केली गेली आहे आणि X440 Roadster वर आधारित आहे. कंपनीने सादर केलेली ही पहिली प्रीमियम सेगमेंट 400cc+ बाईक आहे. या दोन्ही बाईकबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Hero Xtreme 125R

Xtreme 125R बद्दल बोलायचे झाले तर ही १२५cc बाईक आहे जी सिंगल-चॅनल ABS आणि ऑल-एलईडी लाइटिंग सारख्या वैशिष्ट्यांसह प्रीमियम आणि स्पोर्टी लुकसह येते. Xtreme 125R ला एअर-कूल्ड, १२५cc, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे ८,०००rpm वर ११.५hp जनरेट करते, जे बजाज पल्सर NS125 वगळता, सेगमेंटमधील जवळजवळ प्रत्येक बाईकपेक्षा एक पाऊल पुढे आहे. हिरोचा दावा आहे की, Xtreme 125R चे मायलेज ६६ किमी आहे. Hero ने हे ९५ हजार रुपयांच्या किमतीत ही बाईक सादर केली आहे.

(हे ही वाचा : Ertiga ला तगडं आव्हान देणाऱ्या ‘या’ ८ सीटर MPV कारला ग्राहकांची मोठी मागणी, वेटिंग पीरियड पोहोचला ७ महिन्यांवर )

Hero Mavrick 440

दुसरीकडे, Maverick 440 ला H-shaped LED डेटाइम रनिंग लाइट्स मिळतात. इंजिनच्या बाबतीतही हे खूप शक्तिशाली आहे. ही बाईक ४४० cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिनसह सुसज्ज आहे जी २७ HP ची कमाल पॉवर आणि ३६ Nm चा पीक टॉर्क देते. इंजिन पॉवर ६-स्पीड ट्रान्समिशनद्वारे कार्यक्षमतेने व्यवस्थापित केली जाते.

तीन प्रकारात लाँच

Hero MotoCorp ने Hero Mavrick 440 ही बाईक एकूण तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे, ज्यात बेस, मिड आणि टॉप व्हेरियंटचा समावेश आहे. बेस व्हेरिएंट फक्त एका पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे आणि त्याला स्पोक व्हील मिळतात. मिड व्हेरियंटला अलॉय व्हील आणि दोन कलर पर्याय मिळतील, तर टॉप-स्पेक व्हेरिएंटला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डायमंड-कट अॅलॉय व्हील मिळतील. Maverick 440 साठी बुकिंग फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होईल आणि वितरण एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. या बाईकच्या किमतीबाबत माहिती मिळालेली नाही.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp launches xtreme 125r and unveils mavrick 440 here are price engine features pdb