स्वस्त ते महागड्या आणि आलिशान कारला बाजारात खूप मागणी आहे. अशा परिस्थितीत, जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटा किर्लोस्करची आठ सीटर कार तुम्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही महिने वाट पाहावी लागणार आहे. या कारला बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. परंतु या कारवरील दीर्घ प्रतीक्षा कालावधी पाहून तुम्हाला कार घरी आणण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आजकाल सर्वांना आलिशान गाड्या आवडतात. लोकांना वाहने घेण्यासाठीही बराच वेळ ताटकळत राहावे लागते. Toyota Innova Hycross, Innova Crysta, Mahindra XUV700 आणि Scorpio-N प्रमाणे, या सर्व SUV आणि MPV ला अनेक महिने प्रतीक्षा कालावधी आहे. टोयोटाच्या प्रीमियम एमपीव्ही- इनोव्हा क्रिस्टा आणि हायक्रॉसला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. इतकेच काय, देशात हायक्रॉसवर आधारित मारुती सुझुकी इनव्हिक्टोची मागणीही वाढत आहे.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

(हे ही वाचा: नवीन कार घेताय? मग घाई करा, पुढील महिन्याच्या १ तारखेपासून देशातील ‘या’ लोकप्रिय कंपनीच्या कार महागणार)

तुम्ही जर Toyota Innova Crysta ही कार बुक करण्याची योजना आखत असाल तर या एमपीव्ही कारचा प्रतीक्षा कालावधी ७ महिन्यांपर्यंत आहे. तुम्हाला बुकींगच्या दिवसापासून ७ महिने वाट पाहावी लागणार आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या कारची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. वेटिंग पीरियड ७ महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, जास्त मागणी आणि अपूर्ण उत्पादनामुळे वेटिंग पीरियड वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही झिरो वेटिंग पीरियडसह मिळू शकणारी वाहने खरेदी करण्याची योजना देखील करू शकता.

इनोव्हा क्रिस्टा या MPV चे मॉडेल GX, VX आणि ZX या ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यात २.४L डिझेल इंजिन मिळते. जे ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडले आहे. हे इंजिन १४८bhp पॉवर आणि ३४३ Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात ZX प्रकार फक्त ७-सीट कॉन्फिगरेशनसह येते. मात्र, इतर ट्रिम्सना ७ आणि ८ सीट्स लेआउटचा पर्याय मिळतो.   

या कारमध्ये सात एअरबॅग्ज, ब्रेक असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, ३-पॉइंट सीट बेल्ट आणि वाहन स्थिरता नियंत्रण प्रणाली उपलब्ध आहे. भारतात या कारची किंमत १९.९९ लाख रुपये (एक्स-शोरुम) पासून सुरु होते.