इटलीमध्ये EICMA 2022 या ऑटो शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये रॉयल इन्फिल्डने आपली बहुप्रतीक्षित क्रुजर बाईक सुपर मिटियोर ६५० सादर केली होती. याच शोमध्ये होंडाने आपली नव्या स्क्रॅम्बलरून पर्दा हटवला आहे. Honda CL 500 असे या बाईकचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होंडा सीएल ५०० ही साठ आणि सत्तरच्या दशकातील बाईक्सपासून प्रेरित आहे. खडबडीत रस्त्यांवर चांगली कामगिरी करण्यासह शहरामध्ये चालवता येण्यासाठी ऑफ रोड डायनामिकसह हल्की बाईक निर्माण करण्याचा निर्मात्यांचा हेतू होता.

(pic credit – hondanews)

फीचर

बाईकमध्ये ट्युबसारखी स्टील ट्रेलिस शैलीची मुख्य फ्रेम मिळते. बाईकमध्ये लाँग ट्रॅव्हल सस्पेन्शन देण्यात आले आहेत. पुढील भागात ४१ एमएमचे टेलिस्कोपिक फोर्क आणि परिस्थितीशी जुळवून घेणारे अ‍ॅडजस्टेबल रिअर शॉकअप्स देण्यात आले आहेत. पुढील व्हील १९ इंचचा असून मागील व्हील १७ इंचचा आहे. होंडाने ब्लॉक पॅटर्न टायर्सचा वापर केला आहे. बाईकच्या पुढील आणि मागिल चाकांतील ब्रेक्स एबीएस तंत्रज्ञानाने सूसज्ज आहे. विविध पृष्ठभागांवर आणि ऑफ रोडींगवर चांगली कामगिरी करण्यासाठी ते मदत करतील.

(pic credit – hondanews)

(नवीन जीप ग्रँड चिरोकीची बुकिंग सुरू; एडीएएस, सनरूफने सूसज्ज, व्हिडिओमध्ये पाहा दमदार लूक)

बाईकचे हँडलबार्स उंच आहेत. ट्रेल रायडिंग करताना चालकाला हँडबार्स पकडता यावे यासाठी ते तसे ठेवण्यात आले आहेत. इंधन टाकीला पकडून राहता येईल यासाठी टँक पॅड्स देण्यात आले आहेत. इंधन टाकीची क्षमता १२ लिटरची असून ३०० किमीची रेंज मिळू शकते, असे होंडाचे म्हणणे आहे.

बाईकमध्ये एलईडी लाईटिंग देण्यात आली आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये निगेटिव्ह एलईडीचा समावेश आहे. बाईकमध्ये इमरजेन्सी स्टॉप सिग्नल तंत्रज्ञान देखील मिळत आहे. अचानक जोरदार ब्रेक लावल्यास मागिल इंडिकेटर्स हझार्ड लाईट्स सारखे काम करतात.

(pic credit – hondanews)

(रॉयल इन्फिल्डची बहुप्रतीक्षित क्रुजर बाईक सादर, ६४८ सीसी इंजिनसह मिळतील ‘हे’ फीचर्स)

इतक्या सीसीचे इंजिन

बाईकमध्ये ४७१ सीसी पॅरेलल ट्विन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे ४६ पीएसची शक्ती आणि ४३.४ एनएमचा टॉर्क निर्माण करते. बाईकमधील सहा स्पिड गेअरबॉक्स असिस्ट/स्लिपर क्लचसह मिळते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda cl 500 unveiled at eicma 2022 check specification ssb