संपूर्ण कुटुंबासह बाहेर फिरता यावे, तसेच लाँग टूरवर जाण्यासाठी लोक कार घेतात. मात्र, रोज गरज नसल्याने कार दीर्घकाळ एकाच ठिकाणी पडून राहाते. यामुळे कारचे काही भाग खराब होऊ शकतात आणि तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. एका ठिकाणी दीर्घकाळ कार उभी राहिल्यास पुढील नुकसान होतात.

१) बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते

कार बंद राहिल्यास बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. कार चालत असताना बॅटरी चार्ज होते. मात्र, कार बंद राहिल्यास बॅटरीमधील करंट हळू हळू कमी होते जाते. असे वारंवार झाल्यास बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

(ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ‘या’ बहुप्रतीक्षित एसयूव्ही होऊ शकतात सादर; थारला आव्हान देणार ‘हे’ वाहन)

२) टायर्स खराब होतात

कार दीर्घकाळ बंद अवस्थेत एकाच ठिकाणी पडून राहिल्यास तिच्या टायरवरही परिणाम होतो. कारला एकाच ठिकाणी दीर्घकाळ ठेवल्याने टायरच्या विशिष्ट भागांवर जास्त दाब पडतो. यासोबतच कारच्या टायर्समधील हवा देखिल कमी कमी होत जाते. हवा कमी होणे, तसेच एकाच ठिकाणी दबाव पडत असल्याने टायर कोरडे होऊ लागतात. असे झाल्यावर टायर लवकर खराब होतात.

३) हँडब्रेकने होते नुकसान

उभ्या कारला हँडब्रेक लावल्याने नुकसान होते. कार दीर्घकाळ उभी असताना हँडब्रेक लागलेले असेल तर ब्रेक शू मेटल सोबत चिपकते. असे झाल्यास ब्रेक शू खराब होते आणि नंतर मेकॅनिककडे गेल्यावरच कार दुरुस्त होऊ शकते.

४) हिटिंगची समस्या

कार दीर्घकाळ एकाच जागेवर बंद अवस्थेत असल्यास हिटिंगची समस्या होऊ शकते. कारमध्ये रेडिएटर चोक होऊन जातो, त्यामुळे असे होते. इंजिनचे तापमान कमी करण्याचे काम रेडिएटर करते. मात्र, कार एकाच ठिकाणी भरपूर काळ उभी राहिल्यास रेडिएटरच्या जाळीमध्ये धूळ आणि माती साचते. यामुळे रेडिएटर चोक होतो. चोक झाल्यावर जेव्हा कार चालवल्या जाते तेव्हा रेडिएटर पूर्ण क्षमतेने काम करत नाही. असे झाल्यास कारमध्ये हिटिंगची समस्या निर्माण होऊ शकते.

(ओलाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर ग्राहकांसाठी सादर, १०० किमी रेंज, इतकी आहे टॉप स्पीड)

५) कार गंजू शकते

दीर्घकाळ बंद असलेली कार गंजू शकते. दीर्घ काळ एखाच ठिकाणी ठेवल्यावर कारभोवती माती साचते. ही माती कारवर पण जमू लागते. आणि नंतर त्यास पाणी लागल्यावर बराच काळ ओलावा राहातो. ओलावा आणि माती एकाच ठिकाणी असल्याने गंज लागण्यास सुरुवात होते.