Mahindra Bolero Maxx Pik-Up Launched: भारतातील त्यांच्या SUV कारसाठी प्रसिद्ध कंपनी महिंद्राने आज मंगळवारी नवीन बोलेरो मॅक्स पिक-अप लाँच केले आहे. नवीन बोलेरो पिक-अप ट्रक एचडी आणि सिटी या दोन सीरीजमध्ये उपलब्ध असेल. हे एकूण चार प्रकारात आणले गेले आहे. HD मालिका 2.0L, 1.7L, 1.7L आणि 1.3L; सिटी सिरीज 1.3L, 1.4L, 1.5L आणि CNG प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फक्त ‘इतक्या’ रुपयात डाऊनपेमेंटवर करा बुक

महिंद्राचा दावा आहे की, नवीन बोलेरो आता हलकी, कॉम्पॅक्ट आणि अधिक वापरण्यायोग्य आहे. यामध्ये डिझेलसोबत सीएनजीचाही पर्याय मिळणार आहे. त्याचा कार्गो बेड ३०५० मिमी लांब आहे आणि त्याची पेलोड क्षमता १.३ टन ते २ टन आहे. विशेष बाब म्हणजे हे पिकअप २४,९९९ रुपयांच्या डाऊनपेमेंटवर बुक केले जाऊ शकते.

(हे ही वाचा: Hero समोर तगडं आव्हान, टाटाने बाजारात दाखल केली स्वस्तात मस्त सायकल, किंमत फक्त…)

वैशिष्ट्ये कोणती आहेत?

याशिवाय, बोलेरो मॅक्स पिक-अपमध्ये iMAXX अॅप देखील प्रदान करण्यात आले आहे, ज्याद्वारे ग्राहक त्यांच्या पिक-अपचा मागोवा घेऊ शकतात. अॅपमध्ये ५० हून अधिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, ज्यात वाहन ट्रॅकिंग, मार्ग नियोजन, भू-फेन्सिंग, आरोग्य निरीक्षण इत्यादींचा समावेश आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात हाइट-एडजस्टेबल ड्राइव सीट,, २०,००० किमी सर्व्हिस इंटरव्हल, रुंद व्हील ट्रॅकचा समावेश आहे.

महिंद्रा बोलेरो मॅक्स पिक-अप मधील ड्रायव्हिंग वैशिष्ट्ये

  • ५.५ मीटरचं शॉर्ट टर्निंग रेडियस
  • शहर वाहतुकीसाठी पिकअप चांगले
  • पार्किंगसाठी कॉम्पॅक्ट डिझाइन
  • कोणत्याही त्रासाशिवाय उड्डाणपुलावर चढण्याची क्षमता

किंमत

कंपनीने Mahindra Bolero Maxx Pik-Up ला ७.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) मध्ये लाँच केलं आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra launches all new bolero maxx pik up starting at rs 7 85 lakh range can be booked at a minimum down payment of rs 24999 pdb