Tata Stryder Street Fire 21-speed bicycle: भारतीय वाहन बाजारात स्कूटर आणि बाइकसह सायकल्सची देखील मागणी वाढली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या भारतात नवनवीन इलेक्ट्रिक वाहनं लाँच करत आहेत. टाटा एंटरप्राइझ आपल्या इलेक्ट्रिक उत्पादनांचा पोर्टफोलिओ वेगाने विस्तारत आहे. आता कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये सर्वोत्तम विक्री होणाऱ्या स्ट्रीट फायर रेंजमध्ये एक नवीन सायकल सादर केली आहे. त्याचे नाव स्ट्रीट फायर 21 स्पीड (Street Fire 21 Speed) आहे. कंपनीची ही सायकल मल्टी-स्पीड सायकल आहे. ही सायकल खास स्ट्रीट फायर डेझर्ट स्टॉर्म कलरमध्ये सादर करण्यात आली आहे, याशिवाय ती पांढऱ्या रंगातही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Street Fire 21-speed सायकल वैशिष्ट्ये

स्ट्रीट फायर 21 स्पीड नवीनतम फीचर्ससह सादर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे, स्ट्रीट फायर सिंगल स्पीड अतिशय खास रंग प्रकारात सादर करण्यात आलय. दोन्ही सायकल टाटा स्ट्रायडरच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येतील. या मोठ्या सवलतींसह लाँच करण्यात आल्या आहेत.

Maruti Suzuki Brezza SUV
मायलेज २५.५१ किमी, मारुतीच्या ‘या’ स्वस्त SUV कारला बाजारपेठेत ग्राहकांची मोठी मागणी, किंमत फक्त…
BMW 5 Series launched in India
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले! BMW चा देशातील बाजारपेठेत मोठा धमाका; ‘या’ नव्या कारसह इलेक्ट्रिक स्कूटर केली दाखल, पाहा किंमत
Tata Curvv
बाकी कंपन्यांची उडाली झोप, टाटाची नवी SUV येतेय बाजारात, पेट्रोल, डिझेल अन् इलेक्ट्रिक पर्यायात उपलब्ध, ‘इतकी’ मिळेल रेंज
Best Selling SUV
मारुतीची Wagon R नव्हे तर Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, ३० दिवसात १८ हजाराहून अधिक गाड्यांची विक्री
Traffic Indiscipline Soars in Nashik, Automatic Signals in nashik, Traffic Police to Enforce Stricter Measure in nashik, e chllan in nashik, e challan, e challan penalty, nashik news,
नाशिक : बेशिस्त वाहनचालकांना लवकरच इ चलनव्दारे दंड
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : नक्कल करून गुंतवणूक होत नाही
Niva Bupa Health Insurance Proposal for IPO
निवा बूपा हेल्थ इन्शुरन्सचा ‘आयपीओ’साठी प्रस्ताव
Loksatta kutuhal Insider Trading Covered by Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेतून ‘इनसायडर ट्रेडिंग’ला चाप

(हे ही वाचा : Venue, Nexon ची होणार सुट्टी! देशात दाखल झाली मारुतीची सर्वात स्वस्त कार, एका लिटरमध्ये कापणार २२.८९ किमी)

स्ट्रीट फायर 21 स्पीड ही सिटी बाईक आहे. शहरी वातावरणानुसार त्याची रचना करण्यात आली आहे. बाईकला १९-इंचाची लाइटवेट कार्बन स्टील फ्रेम मिळते. मजबुती देण्यासाठी, स्ट्रीट फायर २१ स्पीडमध्ये दुहेरी-वॉल अलॉय रिम्स देण्यात आले आहेत, ते शिमॅनो २१-स्पीड गियरिंगसह फिट केले गेले आहेत. ही बाईक व्हाईट आणि डेझर्ट स्टॉर्म या दोन्ही कलर स्कीममध्ये उपलब्ध आहे. नवीन प्रकारातील उष्णता प्रतिरोधक ग्राफिक्स आणि TIG-वेल्डेड १९-इंच स्टील फ्रेम स्ट्रीट फायर रेंजची उत्कृष्ट वैशिष्ट्ये समोर आणतात. ब्लॅक पावडर कोटेड रिम्स आणि इतर विशेष वैशिष्ट्ये चांगल्या सिटी राइडिंगसाठी उपयुक्त ठरतात.

Street Fire 21-speed किंमत

अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त टाटा स्ट्रायडरची स्ट्रीट फायर 21 स्पीड ९,५९९ रुपयांना आणि स्ट्रीट फायर सिंगल स्पीड डेझर्ट स्टॉर्म ६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.