Best Selling 7 Seater: भारतात SUV सोबत ७ सीटर कारला चांगली मागणी आहे. भारतात अधिक आसन क्षमता असलेल्या गाड्या अधिक पसंत केल्या जातात. अनेकजण आपल्या कुटुंबियांच्या विचार करून कार खरेदी करतात. यात मोठं कुटुंब असल्यास अनेक लोक ७ सीटर कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. मारुती सुझुकी एर्टिगा ही देशातील लोकप्रिय सात सीटर कार आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात एका स्वस्त सेव्हन सीटर कारने एर्टिगासह इतर सर्व वाहनांना मात देत नंबर वन बनण्यात यश मिळविलं आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बेस्ट सेलिंग ७-सीटर कार
- फेब्रुवारी २०२३ मध्ये, मारुती सुझुकी इको ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी सात सीटर कार ठरली आहे. गेल्या महिन्यात त्याचे ११,३५२ युनिट्स विकले गेले आहेत, तर एक वर्षापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २०२२ मध्ये इकोचे फक्त ९१९० युनिट्स विकले गेले होते. अशाप्रकारे, या कारने सुमारे २४ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. Maruti Eeco ची किंमत ५.२५ लाख ते ६.५१ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. Eeco चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे, ५-सीटर स्टँडर्ड (O), ५-सीटर AC (O), ५-सीटर AC CNG (O) आणि ७-सीटर स्टँडर्ड (O). मारुती पाच मोनोटोन रंगांमध्ये Eeco विकते.
(हे ही वाचा : Maruti Brezza ची बोलती बंद करण्यासाठी टाटाने रचला नवा सापळा, ‘या’ दोन SUV मध्ये देणार CNG किट )
- महिंद्रा बोलेरो हे मारुती इको नंतर सर्वाधिक विक्री होणारे सात आसनी वाहन आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये बोलेरोच्या ९,७८२ युनिट्सची विक्री झाली आहे. तर १ वर्षापूर्वी ११,०४५ युनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे महिंद्रा बोलेरोच्या विक्रीत ११ टक्क्यांची घट झाली आहे.
- मारुती सुझुकी एर्टिगा तिसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये एर्टिगाच्या ६४७२ युनिट्सची विक्री झाली आहे. तर १ वर्षापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याच्या ११,०४५ युनिट्सची विक्री झाली होती. अशा प्रकारे, Ertiga च्या विक्रीत ४४ टक्क्यांची घट झाली आहे.
First published on: 21-03-2023 at 12:18 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki eeco has been the best selling seven seater car in the country in february 2023 its 11352 units have been sold in the last month pdb