मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki) ही भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमधील लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांची या कंपनीच्या उत्पादनांना पसंती मिळत आहे. भारतीय ग्राहकांना उत्तमोत्तम सुविधा मिळावी यासाठी मारुती सुझुकी प्रयत्नशील असते. ग्राहकांच्या सोयीसाठी या कंपनीने आपल्या देशात तब्बल ४,५०० सर्व्हिस सेंटर्सची उभारणी केली आहे. यामुळे त्यांचे भारतातील सर्व्हिस नेटवर्क आणखी विस्तृत झाले आहे.
नुकतंच कंपनीने ४,५०० व्या सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेउची म्हणाले, “आमचे डिलर्स आणि मारुती सुझुकीतील सहकाऱ्यांंचे या प्रसंगी मी अभिनंदन करतो. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही कंपनी म्हणून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रोडक्ट्सची उच्च गुणवत्ता आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिस यामुळे ग्राहकांची निष्ठा आम्ही मिळवली आहे.”
ते पुढे म्हणाले, सध्या भारतातील २,२७१ शहरांमध्ये एकूण ४,५०० सर्व्हिस सेंटर्स उभारण्यात आम्हाला यश मिळाले आहे. यामुळे आम्ही ग्राहकांना ‘Joy of Mobility’ ऑफर देण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहचून त्यांना जलद, परवडण्याजोगी, उच्च गुणवत्तेची सेवा देण्यासाठी आम्ही देशामध्ये विस्तृत सर्व्हिस नेटवर्क तयार केले आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये मारुती सुझुकीने ३१० सर्व्हिस सेंटर्सची उभारणी केली. जास्तीत जास्त ग्राहकांना सेवेचा लाभा घेता यावा यासाठी भारतातील अनेक सेंटर्स हे बाजारपेठेशी जोडलेले आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी या कंपनीने अनेक नाविण्यपूर्ण फॉरमॅट्स आणल्याचा पाहायला मिळते. सर्व्हिस सेंटर्समध्ये सेव्हेन-डे-अ-विक आणि नाईट सर्व्हिस अशा सुविधा, डोरस्टेप सर्व्हिस फॅसिलिटी, सर्व्हिस ऑन व्हिल्स फॅसिलिटी, मारुती मोबाइल सपोर्ट आणि क्विक रिस्पॉन्स टीम अशा सुविधा आहेत. कंपनीने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी मारुती सुझुकी सेल्स अँड सर्व्हिस पॉइंट (MSSSP) उपक्रम सुरू केला आहे. तसेच कंपनीने विविध ठिकाणी ड्राय वॉश सेवा देणार्या छोट्या कार्यशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.