Maruti Suzuki Car Price Hike: मारुती कार खरेदी करणाऱ्यांमध्ये शहरांपासून खेड्यापर्यंतच्या लोकांचा समावेश आहे. मात्र, मारुतीच्या लाखो नवीन ग्राहकांसाठी आता एक वाईट बातमी आहे. मारुतीने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा आज सोमवारी केली आहे. याचाच अर्थ आता तुम्ही मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढीव किमतीमुळे वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, कंपनीने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकीच्या सर्वच गाड्यांच्या मॉडल्सच्या किमतीत वाढ होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मारुती कमी किमतीच्‍या छोट्या कार अल्‍टोपासून ते मल्‍टी-युटिलिटी व्‍हिकल इनव्हिक्‍टोपर्यंत अनेक वाहनांची विक्री करते. त्यांची किंमत ३.५४ लाख ते २८.४२ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. मात्र, किमती किती वाढवल्या जातील, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

(हे ही वाचा : रस्त्यावर बजाजची ‘ही’ स्वस्त बाईक धावणार नाही; खरेदीसाठी व्हायची मोठी गर्दी, आता ग्राहकांकडे कोणता पर्याय? )

मारुती सुझुकी इंडियाने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, एकंदर महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या किमतीमुळे वाढलेल्या किमतीच्या दबावामुळे जानेवारी २०२४ मध्ये कंपनीने आपल्या कारच्या किमती वाढवण्याची योजना आखली आहे. म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत ग्राहकांना स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी आहे. त्यानंतर कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार. जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीनेही कच्च्या मालाची वाढती मागणी आणि ऑपरेटिंग खर्चाचा हवाला देत पुढील वर्षी जानेवारीपासून भारतात आपल्या वाहनांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki india ltd on monday november 27 said it will hike prices of its vehicles with effect from january 2024 pdb