आपल्या देशात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनाला मागणी आहे. कारण देशातील बहुतांश लोक छोट्या आणि दैनंदिन जीवनातील कामांसाठी दुचाकी वापरण्यास प्राधान्य देतात. या सेगमेंटमध्ये भारतात मायलेज बाईक खूप पसंत केल्या जातात. हेच कारण आहे की, देशात मायलेज बाईकला मोठी मागणी असून याची विक्रीही वाढत आहे. यातच बजाजच्या बाईकला भारतीय बाजारात खूप पसंत केले जातात. बजाजच्या बाईक आपल्या मायलेजमुळे नेहमीच चर्चेत असतात. यातच बजाजने आपल्या ग्राहकांना धक्का दिलाय. कंपनीने आपली एक लोकप्रिय बाईक बंद केली आहे.

बजाजने त्यांच्या Pulsar N160 बाईकचा सिंगल-चॅनल ABS प्रकार बंद केला आहे. अद्ययावत बजाज पल्सर N160 मागील वर्षी २ प्रकारांमध्ये लाँच करण्यात आले होते. सिंगल-चॅनल ABS आणि ड्युअल-चॅनल ABS. दोन्ही व्हेरियंटच्या किमतीत सुमारे ५ हजार रुपयांचा फरक आहे. यामुळे सिंगल-चॅनल एबीएस व्हेरियंटची मागणी कमी झाली, त्यामुळे ती बंद करण्यात आली.

(हे ही वाचा : सणासुदीच्या ३० दिवसात ३.११ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; घेण्यासाठी शोरूम्समध्ये उसळली गर्दी )

बजाज पल्सर एन160 मध्ये १६४.८cc, ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन १६ पीएस पॉवर आणि १४.६५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी ५-स्पीड गिअरबॉक्स युनिट देण्यात आले आहेत. सस्पेन्शनसाठी, बाईकला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक इनव्हर्टेड फॉर्क्स आणि मागील बाजूस गॅस-चार्ज केलेले मोनो-शॉक युनिट मिळते, तर ब्रेकिंगसाठी, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक प्रदान केले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Pulsar N160 सुरुवातीची किंमत

बजाज पल्सर N160 ही बाईक ११५ किमी/तास वेगाने धावू शकते आणि एका लिटर पेट्रोलमध्ये ४० ते ४५ किमी/लीटर मायलेज देते. त्याच्या सिंगल-चॅनल ABS व्हेरिएंटची किंमत १.२२ लाख रुपये आहे, तर ड्युअल-चॅनल ABS ची किंमत १.२७ लाख रुपये (किंमत, एक्स-शोरूम) आहे.