'या' १० यूनिक वैशिष्ट्यांमुळे Indian Army मध्ये दाखल होवू शकते Maruti Jimny 5 Door, 'या' जबरदस्त कारला करणार रिप्लेस | Maruti Suzuki Jimny which was unveiled at the 2023 Auto Expo will soon replace the Gypsy in the Indian Army fleet | Loksatta

‘या’ १० यूनिक फीचर्समुळे Indian Army मध्ये दाखल होऊ शकते Maruti Jimny 5 Door, ‘या’ जबरदस्त कारला करणार रिप्लेस

Maruti Jimny 5 Door: ऑटो एक्सपो २०२३ मध्ये कंपनीने जिम्नीला सादर केले होते. आता मारुतीची जिम्नी आगामी काळात भारतीय लष्करात दिसू शकते.

Maruti Jimny SUV for Indian Army
Maruti Jimny SUV भारतीय लष्करात दाखल होऊ शकते. (Photo-financialexpress)

Maruti Jimny SUV for Indian Army: नुकतीच Maruti Jimny 5 Door ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर झाली आहे. आता मारुती सुझुकीची पॉवरफुल एसयूव्ही जिमनी 5 डोअर भारतीय लष्करात सामील होऊ शकते. ही एसयूव्ही Gypsy ची जागा घेऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. कंपनी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केल्यापासून जिमनीला खूप पसंत केले जात आहे. ऑटो शोच्या वेळीच भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस ही एसयूव्ही पडली. चला तर जाणून घेऊया या एसयूव्हीची १० खास वैशिष्ट्ये, ज्यामुळे ती सैन्याचा भाग होऊ शकते…

Maruti Jimny 5 Door एसयूव्हीची १० खास वैशिष्ट्ये पाहा

१. जिमनीमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ती सैन्यासाठी अतिशय योग्य मानली जाते. त्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जिमनी 4X4 आहे.

२. मारुती जिमनी हिल डिसेंट कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल यासारख्या जबरदस्त वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.

(हे ही वाचा : Tata च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने २.५ वर्षांत केली तब्बल १४ लाख रुपयांची बचत, बॅटरीमध्येही आली नाही अडचण )

३. या SUV चा डिपार्चर अँगल ५० डिग्री, रॅम्प ब्रेकओव्हर एंगल २४ डिग्री, ऍप्रोच एंगल ३६ डिग्री आणि ग्राउंड क्लीयरन्स २१० मिमी आहे.

४. जिमनीची लांबी ३,९८५ मिमी, रुंदी १,६४५ मिमी आणि उंची १,७२० मिमी आहे. या एसयूव्हीचा व्हीलबेस २,५९० मिमी आहे.

५. जिमनी 5 डोअर ही चार सीटर एसयूव्ही आहे. यात २०८ लिटर क्षमतेचा सामानाचा डबा आहे. मागील सीट फ्लॅट फोल्ड करून ते ३३२ लिटरपर्यंत वाढवता येते.

६. या SUV मध्ये मारुती सुझुकीने १.५-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे १०४.८ PS आणि १३४.२ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते.

(हे ही वाचा : अन् ५० वर्षापूर्वी ‘Ambassador’ ची किंमत फक्त ‘इतकी’, आनंद महिंद्राही झाले चकित )

७. मारुतीच्या या एसयूव्हीमध्ये कंपनीने 40 लिटर इंधन क्षमतेची टाकी दिली आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा इंधन भरावे लागत नाही.

८. मारुती जिमनी मैदानी प्रदेशात तसेच वाळवंटात आणि उंचावरील भागात वापरता येते.

९. कंपनीने जिमनीमध्ये एअरबॅग्ज, एबीएस, पॉवर स्टीयरिंग किंवा मॅन्युअल एअर कंडिशनिंग सारखी नवीनतम सुरक्षा वैशिष्ट्ये देखील दिली आहेत.

१०. कंपनीचा दावा आहे की, या एसयूव्हीच्या इंटीरियरला मिनिमलिस्ट डिझाइन देण्यात आले आहे, ज्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित होत नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:37 IST
Next Story
Tata च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने २.५ वर्षांत केली तब्बल १४ लाख रुपयांची बचत, बॅटरीमध्येही आली नाही अडचण