Mercedes Electric Car: जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने काही महिन्यांपूर्वी आपली इलेक्ट्रिक कार ‘Mercedes-Benz EQS’ 580 भारतीय बाजारात लाँच केली होती. आत्तापर्यंत ही देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार होती जी फुल चार्जमध्ये ८५७ किमी धावते. आता कंपनीने ‘Mercedes Benz Vision EQXX’ ही आणखी एक सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही ईव्ही कार एका चार्जवर ते १००० किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Mercedes Benz Vision EQXX ईव्हीचे जबरदस्त फीचर्स

Mercedes Benz Vision EQXX या कारमध्ये एक मोठा आणि मजबूत बॅटरी पॅक असेल. कंपनीने कारच्या डिझाईनवरही खूप मेहनत घेतली आहे. ही लो प्रोफाईल कार लूकच्या बाबतीतही शानदार दिसत आहे. ही कार प्रति १०० किमीसाठी १० kWh पेक्षा कमी पॉवर वापरेल. या कारमध्ये स्थापित इलेक्ट्रिक मोटर २४५ bhp पॉवर जनरेट करते.

(हे ही वाचा : अर्रर्र! Mahindra ची ‘ही’ SUV कोणीच खरेदी करेना; विकली गेली फक्त दोन युनिट्स )

बॅटरी क्षमता

बॅटरीची क्षमता मोठी असूनही या कारचा आकार लहान आहे. ही कार आपल्या क्षमतेच्या इतर बॅटरीच्या जवळपास निम्मी आहे. रेंज वाढवण्यासाठी, छतावर एक सोलर पॅनल देखील ठेवण्यात आले आहे, ज्याद्वारे बॅटरीची रेंज एका दिवसात २५KM पर्यंत वाढते. तथापि, हे सौर पॅनेल मागील खिडकीला देखील कव्हर करतात. या कारची सिंगल चार्जवर बॅटरी महिनाभर चालणार असा दावा कंपनीने केला आहे. एकंदरीत, जर तुम्ही दररोज २०KM ऑफिसला जात असाल आणि महिन्यातून २५ दिवस ऑफिसला जावे लागत असेल, तर त्याची बॅटरी पूर्ण महिना टिकेल.

डिझाईन

मर्सिडीजची ही इलेक्ट्रिक कार डिझाईनच्या बाबतीत अतिशय आकर्षक आहे. समोर, एक LED लाइटबार आहे जो कारच्या रुंदीवर पसरलेला आहे. मर्सिडीज बेंझचा लोगो बोनेटवर स्टिकर म्हणून दिलेला आहे. तसेच हिचे डिझाइनही अत्यंत एअरोडायनॅमिक ठेवण्यात आले आहे. या कारला फ्लश डोअर हँडलही देण्यात आले आहे. या कारमध्ये बरेच रिसायकल्ड मटेरियल्स वापरण्यात आले आहेत. याच बरोबर ही एक लाइटवेटेड कार आहे. हिचे व्हर्जन केवळ १७५० किलोग्रॅम एवढे असून यात फ्लश डोअर हँडल्स देखील आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercedes benz vision eqxx electric car launched in india pdb