देशात सातत्याने इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आता एक वाईट बातमी आहे. एमजी मोटर्सने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. MG Motor India ने गेल्या वर्षी भारतात नवीन MG Comet EV लहान इलेक्ट्रिक कार सादर केले होती. ही दोन डोअर इलेक्ट्रिक कार अनेक नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, एवढेच नाही तर या कारच्या आतील भागात फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले देखील आहे. जे त्याचा लुक अधिक आकर्षित करते. ही कार भारतीय बाजारातील कंपनीची दुसरी आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. परंतु कंपनीने कारच्या किंमतीत वाढ केली आहे. आता तुम्हाला कार खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंगल चार्जवर २३० किमी रेंज

MG Comet EV १७.३kWh लिथियम-आयन बॅटरीने सुसज्ज आहे आणि त्याची इलेक्ट्रिक मोटर ४२ PS पॉवर आणि ११०Nm टॉर्क जनरेट करते. ही कार सिंगल चार्जमध्ये २३० किमीची रेंज देते. ३.३kW चार्जरने त्याची बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे सात तास लागतात, तर ५ तासांत तिची बॅटरी ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

(हे ही वाचा: बाकी कंपन्यांची उडाली झोप! TVS ची ‘ही’ स्कूटर नव्या अवतारात होणार देशात दाखल, किती असणार किंमत? )

MG Comet EV फीचर्स

या इलेक्ट्रिक कारमध्ये १०.२५-इंचाची स्क्रीन असेल, जी टच स्क्रीन युनिट इंफोटेनमेंट युनिट म्हणून काम करते, तर ड्रायव्हरच्या समोरची दुसरी स्क्रीन इन्स्ट्रुमेंटेशनसाठी वापरली जाते. यासोबतच या मॉडेलमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, पुढील आणि मागील एअरबॅग्ज देखील मिळतील. मागील पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्सिंग कॅमेरा, मल्टिपल एअरबॅग्ज, पॉवर-फोल्डिंग ORVM, एलईडी हेडलाइट्स, अॅम्बियंट लाइट, कनेक्टेड कार टेक, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. याला दोन दरवाजा सोबत आणले आहे. ज्यात ४ लोक बसण्याची जागा मिळेल.

एमजी कॉमेट ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे आणि ती खूप पसंतही केली जाते. पण आता ही इलेक्ट्रिक कार घेणे महाग झाले आहे. कंपनीने त्याची किंमत १३,००० रुपयांनी वाढवली आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे या कारचे बेस मॉडेल अजूनही ६.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे.

MG ने त्याच्या एक्सक्लुझिव्ह आणि एक्साईट प्रकारांच्या किमती ११,००० ते १३,००० रुपयांनी वाढवल्या आहेत. Comet EV च्या Evergreen Limited Edition च्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आता या कारची किंमत ६.९९ लाख ते ९.४० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg motor india announces a price hike for the mg comet ev and other models due to rising input costs pdb