रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन अपघातात पीडित व्यक्तीसाठी नुकसान भरपाई ही १२,५०० रुपये ऐवजी ५०,००० रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. याशिवाय रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्यांची भरपाई २५,००० हजार रुपये ऐवजी २,००००० लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. हा नियम १ एप्रिल २०२२ पासून भारतात रस्ते वाहतूक आणि राजमार्गवर हा नियम लागू करण्यात येणार आहे. याशिवाय, हिट अँड रन अॅक्सिडेंड पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई म्हणून मोटर व्हीकल दुर्घटना फंड बनवण्यात आले आहे. याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखीन एका नियमात झाला बद्दल

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘रिजिड’ वाहने आणि दुचाकी वाहून नेणाऱ्या ट्रेलरमध्ये जास्तीत जास्त तीन डेक ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वाहून नेण्याची क्षमता ४० ते ५० टक्क्यांनी वाढणार आहे. ट्रेलरचा कॅरेजचा भाग ड्रायव्हरच्या केबिनच्या वर नसावा, अशी अटही ठेवली आहे.

रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने २५ फेब्रुवारीला अधिसूचना जारी करून केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन करून रिजिड व्हीकल आणि ट्रेलर मध्ये टूव्हीलरसाठी जास्तीत जास्त तीन डेकची परवानगी दिली आहे.

वेगळ्या जारी अधिसूचनेत मंत्रालयाने म्हटले की, पैसा घेऊन जाणाऱ्या गाड्या (कॅश व्हॅन) भारतीय मानक ब्यूरो अधिनियम २०१६ अंतर्गत (बीआयएस) नियम अधिसूचित होण्यापर्यंत वाहन उद्योग मानक १६३:२०२० च्या कमीत कमी कालावधीत पूर्ण करतील. यावरून कॅश व्हॅनच्या विशेष उद्देशीय वाहन रुपात विनिर्माण, टायर, मंजुरी परिक्षण आणि नोंदणी करण्यास मदत मिळेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motor vehicles accident fund rs 2 lakh compensation to victim hit run motor accident scsm