Nissan India कंपनीने आपली सब कॉम्पॅक्ट SUV मॅग्नाइट (Magnite) चे स्पेशल एडिशन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, निसानचे गिझा व्हेरियंट हे जपान थिएटर आणि तेथील एक्सप्रेसिव्ह म्युझिकल थीमपासून प्रेरित आहे. या नवीन स्पेशल एडिशनमध्ये काय काय फीचर्स आहेत ते पाहुयात.
Nissan Magnite Geza Edition चे फीचर्स
निसान Magnite च्या नवीन गिझा एडिशनमध्ये काही अतिरिक्त फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो, जेबीएल स्पीकर, अॅपवर आधारित कंट्रोल , रिअर कॅमेरा, बेज अपहोल्स्ट्री (पर्यायी) शार्क-फिन अँटेना आणि ९.० इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देखील मिळतो. तसेच यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा देखील समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त financial express ने दिले आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स
निसान Magnite च्या गिझा एडिशन सध्या बाजारामध्ये एकाच प्रकारामध्ये उपलब्ध आहे. ही नवीन कार ५ रंगांमध्ये बाजारामध्ये उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये १.० लिटरचे नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड असे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७१ बीएचपीची पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. कारच्या इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आले आहे. Magnite च्या हायर व्हेरिएंटमध्ये ५-स्पीड MT आणि CVT गिअरबॉक्ससह १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते.
किंमत आणि स्पर्धा
Nissan Magnite Geza एडिशन कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये ७.३९ लाख रुपयांमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या नवीन कारचे बुकिंग देखील सुरू केले आहे. ज्यांना ही कार खरेदी करायची आहे ते ११,००० रुपये देऊन याचे बुकिंग करू शकतात. लवकरच कंपनी आपल्या नवीन कारची डिलिव्हरी सूरू करेल अशी अपेक्षा आहे. Magnite च्या स्टॅंडर्ड व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत ही ५,९९ लाख रुपयांपासून ते ११.०२ रुपयांच्या मध्ये आहे.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nissan india launch magnite geza special edition with 11000 booking started in 5 colours varient check price and features tmb 01