देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. जर गाडीवर फास्टॅग नसेल तर तर आपल्याला दुप्पट टॅक्स भरावा लागू शकतो. फास्टॅग हा एक स्टिकर असतो जो आपल्या गाडीच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. जर तुम्ही तुमच्या वाहनावर फास्टॅग लावला नसेल, तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करू शकता. यासाठी काय प्रक्रिया आहे ते जाणून घेऊया.

तुम्ही घरबसल्या पेटीएम वरून फास्टॅग ऑर्डर करू शकता. यासाठी पेटीएमने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. फास्टॅग वापरण्यासाठी तुमचे बँक खाते पेटीएमशी लिंक करण्याची गरज नाही. तुम्ही पेटीएम वॉलेटच्या रकमेसह फास्टॅगचा रिचार्ज करू शकता आणि सर्व टोल भरण्यासाठी वापरू शकता. यासोबतच तुमच्या ट्रिपची सर्व माहिती तुमच्या पेटीएम अ‍ॅपवर उपलब्ध असेल.

Google Pay च्या मदतीने करता येणार सोन्याची ऑनलाइन खरेदी-विक्री; ‘या’ स्टेप्सचा करा वापर

पेटीएम अ‍ॅपवरून असा ऑर्डर करा फास्टॅग

पेटीएम वरून फास्टॅग ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. पेजवर दाखवलेल्या पर्यायामध्ये फास्टॅग दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला फास्टॅगचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुमचा वाहन नोंदणी क्रमांक टाका. यानंतर, तुमच्या वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राचा (RC) पुढील आणि मागील फोटो अपलोड करा. नोंदणी प्रमाणपत्राच्या फोटोचा आकार २ एमबीपेक्षा जास्त नसावा याची खात्री करा. फास्टॅग खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५०० रुपये द्यावे लागतील.

पेमेंटसाठी नोंदणीकृत पेटीएम मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी आणि पासवर्डसह तुमच्या पेटीएम खात्यावर जा आणि वॉलेटद्वारे पेमेंट करा. तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे असल्याची खात्री करा जेणेकरून टोल प्लाझा पेमेंट आपोआप कापले जातील. कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला पेटीएम फास्टॅग जारी केला जाईल.

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

टॅग तुमच्या पत्त्यावर पाठवला जाईल. टॅग जारी करण्यासाठी तुम्हाला वाहन नोंदणीची प्रत देखील दाखवावी लागेल. एकदा जारी केल्यानंतर, तुमचा फास्टॅग २४ ते ४८ तासांच्या आत सक्रिय होईल. लक्षात ठेवा की टोल प्लाझातून जाण्याच्या ३० मिनिटांपूर्वी तुमचे पेटीएम वॉलेट रिचार्ज करणे आवश्यक आहे. जर तुमच्या वाहनावर हा फास्टॅग लावला असेल, तर तुम्ही टोल प्लाझातून कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज बाहेर पडू शकता.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर २२ बँकांमधून फास्टॅग खरेदी केले जाऊ शकतात. हे पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील फास्टॅग उपलब्ध आहे. याशिवाय फिनो पेमेंट्स बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँक देखील फास्टॅग जारी करतात. तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डसोबत फास्टॅग लिंक करू शकता. अशा परिस्थितीत जिथे टोल आकारला जाईल, तिथे तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.

सात राज्यातील १४ मुलींशी केले लग्न, नंतर पैसे घेऊन झाला फरार; पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश

फास्टॅग किती दिवस चालेल?

फास्टॅगची वैधता फास्टॅग जारी केल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांसाठी आहे. तुमच्या रिचार्जची कोणतीही वैधता नाही. म्हणजेच तुम्ही रिचार्ज केल्यानंतर बराच काळ राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास केला नसेल, तर हा रिचार्ज फास्टॅगची वैधता असेपर्यंत वैध असेल. तसेच, फास्टॅग वॉलेटमध्ये मिनिमम बॅलन्सची समस्या नाही, तुम्ही कमी बॅलन्समध्येही प्रवास करू शकता.