90 हजाराची Bajaj Pulsar 125CC केवळ 15 हजारात आणा घरी; जाणून घ्या ऑफर्स व वैशिष्ट्य

सद्य बाजारात बजाज पल्सरच्या विविध श्रेणींपैकी १२५ सीसी बाईकची मागणी सर्वाधिक आहे.

90 हजाराची Bajaj Pulsar 125CC केवळ 15 हजारात आणा घरी; जाणून घ्या ऑफर्स व वैशिष्ट्य
Bajaj Pulsar 125CC केवळ 15 हजारात आणा घरी (फोटो: संग्रहित)

बजाज कंपनीची पल्सर (Pulsar) बाईक, भारतीय मोटरसायकलच्या बाजारात अत्यंत लोकप्रिय आहे. स्पोर्ट्स बाईकसारखा क्लासिक लुक, स्टायलिश डिझाईन व जोरदार वेगासह अधिक मायलेज यासारख्या वैशिष्ट्यांमुळे ही बाईक नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. सद्य बाजारात बजाज पल्सरच्या विविध श्रेणींपैकी १२५ सीसी बाईकची मागणी सर्वाधिक आहे. या बाईक खरेदी करण्यासाठी आपल्याला सामान्यतः ८१, ३८९ ते ९०, ००३ रुपये खर्च करावे लागतील. मात्र आज आपण अशा काही ऑफर्स बघणार आहोत ज्या वापरून आपण ही तब्बल ९० हजाराची बाईक अवघ्या १५ हजारात आपल्या घरी आणू शकाल.

जर आपले बजेट कमी असेल तर बजाज पल्सर १२५ सीसी बाईक शोरूम मधून घेण्यापेक्षा आपण सेकेंड हॅन्ड गाड्यांची खरेदी- विक्री करणाऱ्या वेबसाईटवर ही बाईक विकत घेऊ शकता. या ऑफर्स वापरून आपल्याला जुन्याच बाईक मिळतील असे समजू नका कारण नीट तपासणी करून व खाली दिलेल्या टिप्स वापरून आपण एक उत्तम डील मिळवू शकता.

Honda ने लाँच केली CB300F क्लासिक बाईक; फीचर्स व किंमतीसह पहा कसा असणार लुक

पहिली ऑफर

OLX या वेबसाईटवर बजाज पल्सर १२५ सीसी बाईकचे २०१४ चे मॉडेल लिस्ट करण्यात आले आहे. या बाईकची किंमत १५,००० रुपये इतकी असून आपण याच प्लॅटफॉर्मवरून विक्रेत्यांशी थेट संपर्क साधून टेस्ट ड्राइव्ह घेऊन मग खरेदीचा निर्णय घेऊ शकाल. यावर पुन्हा आपल्याला कोणतेही डिस्काउंट कुपन मात्र लागू करता येणार नाही.

दूसरी ऑफर

QUIKR वेबसाइटवर बजाज पल्सर १२४ चे २०१२ सालचे मॉडेल लिस्ट करण्यात आले आहे. या बाईकची किंमत १५,००० रुपये इतकी आहे.

तिसरी ऑफर

BIKE4SALE वेबसाइटवर बजाज पल्सर १२४ चे २०१६ सालचे मॉडेल लिस्ट करण्यात आले आहे. इथे या बाईकची किंमत २२ हजार इतकी ठेवण्यात आली आहे. आपल्याला या खरेदीसाठी कोणतेही कर्ज घेता येणार नाही.

Royal Enfield घेऊन येणार इलेक्ट्रिक बुलेट; एका चार्जिंग मध्ये 150 km धावणार, पहा फीचर्स

बजाज पल्सर १२५ सीसी बाईक मध्ये १२४.४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११. ८ पीएस पॉवर देते तर सोबत १०. ८ एनएमचे पीक टॉर्क सुद्धा जनरेट केले जाते. इंजिनसह बाईक मध्ये ५ स्पीड गियरबॉक्स जोडण्यात आला आहे. बजाज पल्सरमध्ये प्रति लिटर पेट्रोल मध्ये ५१. ४६ किमी अंतर कापण्याची क्षमता आहे. या बाईकचे मायलेज ARAI तर्फे प्रमाणित आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand bajaj pulsar 125cc in 15 thousand rupees on olx and other sites check features and offers here svs

Next Story
Petrol-Diesel Price on 14 August 2022: इंधनांच्या किंमतीतील चढ-उतार कायम; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
फोटो गॅलरी