Mahindra Thar: Off Road SUV सेगमेंटमध्ये काही निवडक एसयूव्ही उपलब्ध आहे. ज्यापैकी एक आहे महिंद्रा थार. जी आपल्या डिझाइन शिवाय, आपल्या इंजिन परफॉर्मन्ससाठी अॅडवेंचर आणि स्पोर्ट्स अॅक्टिविटीला पसंत करणाऱ्या लोकांत खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला जर ही गाडी खरेदी करायची असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही जुन्या महिंद्रा थार (सेकंड हँड) संबंधी माहिती देत आहोत, जाणून घ्या डिटेल्स.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Mahindra Thar किंमत

नवी महिंद्रा थार खरेदीसाठी तुम्हाला ९.९९ लाख ते १६.४९ लाख एक्स-शोरूम किंमत मोजावी लागते मात्र, जर तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन महिंद्रा थारचा सेंकंड हँड मॉडेल देखील खरेदी करू शकतात.

Second hand Mahindra Thar

कमी बजेटमध्ये सेकंड हँड महिंद्रा थार विकत घेण्यासाठी तुम्हाला मिळणारा पहिला सौदा CARTRADE वर आहे. येथे महिंद्रा थारचे २०१५ चे मॉडेल हरियाणा नोंदणी क्रमांकासह सूचीबद्ध केले आहे. या SUV ची किंमत ५ लाख रुपये ठेवण्यात आली असून सोबत फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असेल.

(हे ही वाचा : स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ दोन कारवर मिळतोय तब्बल २ लाखांचा डिस्काउंट, ऑफरचे केवळ दोनच दिवस बाकी )

Used Mahindra Thar

वापरलेल्या Mahindra Thar वर आणखी एक स्वस्त कमी बजेट डील OLX वर मिळत आहे आणि येथे २०१६ मॉडेल महिंद्रा थार आहे ज्यात दिल्ली नंबर प्लेट विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. या SUV ची किंमत ५.८० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही SUV खरेदी केल्यावर ग्राहकाला कोणतीही फायनान्स ऑफर किंवा योजना दिली जाणार नाही.

Mahindra Thar Second Hand

महिंद्रा थार सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध असलेल्या ऑफरपैकी तिसरा सर्वात स्वस्त डील QUIKR वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे महिंद्रा थारचे २०१७ मॉडेल हरियाणामध्ये नोंदणीकृत आहे. ही SUV खरेदी केल्यावर ग्राहकाला कोणतीही फायनान्स योजना किंवा ऑफर दिली जाणार नाही.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand mahindra thar under 5 lakh be yours for less than half the price know the details of the cheap deal pdb