Renault Kiger SUV: देशात स्वस्त SUV ची मागणी सातत्याने वाढत आहे. खरं तर यामागचं कारण असं आहे की, बहुतेक लोक फक्त चार वर्षे कार चालवतात आणि नंतर जुनी कार विकून नवीन कार घेतात. दुसरं कारण म्हणजे वाढती रहदारी आणि पार्किंगची कमतरता. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर मार्केटमध्ये SUVचे अनेक पर्याय आहेत. या पर्यायांमध्ये रेनॉल्ट कायगरचादेखील समावेश आहे; जो किमतीसह हाय-एण्ड फीचर्सही देतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुमचं बजेट सहा लाखांच्या आत असेल, तर रेनॉल्टचा हा पर्याय तुमच्यासाठी खरंच बेस्ट ठरेल. सात लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची लहान एसयूव्ही खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करीत असाल, तर रेनॉल्टच्या या दमदार एसयूव्हीच्या फीचर्स, त्याच्या स्पेसिफिकेशन्स, तसेच किमतींबद्दलदेखील एकदा जाणून घ्या…

हेही वाचा… मारुतीसमोर क्रेटा फेल, ‘या’ एसयूव्हीचं लिमिटेड एडिशन झालं लॉंच, दिवाळीत करणार मार्केट जाम

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने आता कारमध्ये वायरलेस स्मार्टफोन मिररिंग, एलईडी हेडलॅम्प व टेललाइट्ससह आठ इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि १६ इंची डायमंड-कट अलॉय व्हील यांसारखे फीचर्स दिली आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम (TCS) व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) यांसारखी सेफ्टी फीचर्सही आहेत.

हेही वाचा… डिस्काउंटसाठी दिवाळीची वाट पाहताय? त्याआधीच घरी आणा ‘ही’ जबरदस्त बाईक, हिरो देतेय ‘या’ बाईक्स आणि स्कूटरवर भरघोस सूट

त्याशिवाय चार एअरबॅग्ज, प्री-टेन्शनर व लोड लिमिटरसह सीट बेल्ट, इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक व ISOFIX सारखे सेफ्टी फीचर्स कारमध्ये उपलब्ध आहेत. या कारची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

इंजिन

हेही वाचा… Diwali Sale: होंडा कंपनीकडून ‘या’ कार्सवर मिळणार तब्बल १ लाखापर्यंत डिस्काउंट, दिवाळी सेलची खास ऑफर जाणून घ्या

रेनॉल्ट कायगरच्या इंजिनाबद्दल बोलायचे झाले, तर ही SUV दोन इंजिने पर्यायांसह येते. 1.0L टर्बो पेट्रोल व 1.0L एनर्जी पेट्रोल इंजिन आहे. ट्रान्स्मिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड एएमटी (AMT) व एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी (X-Tronic CVT) युनिट समाविष्ट आहे. ही SUV 20.62 kmpl इंधन कार्यक्षमता असल्याचा दावा करते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suv under 6 lakhs renault kiger suv price features and engine dvr