Tata Motors Crosses 5 Million Production Milestone: टाटा मोटर्स या भारतातील अग्रगण्‍य ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने ५ दशलक्ष पॅसेंजर वेईकल्‍स उत्‍पादनाचा टप्‍पा संपादित केल्‍याची घोषणा केली. कंपनीने हा सुवर्ण टप्‍पा संपादित केला आणि अधिक उत्‍साहासह कर्मचाऱ्यांनी अद्वितीय पद्धतीने या टप्‍प्‍याला साजरे केले, जेथे टाटा मोटर्स कुटुंब आणि अत्‍यंत प्रशंसित टाटा कार्स व एसयूव्हींची न्‍यू फॉरेव्‍हर रेंज ५०-लाख फॉर्मेशन निर्मितीला साजरे करण्‍यासाठी एकत्र आले. या सुवर्ण टप्‍प्‍यामधून भारतीय ग्राहकांमधील कंपनीच्‍या कार्सची लोकप्रियता दिसून येते.

या ऐतिहासिक टप्‍प्‍याबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ‘‘आज टाटा मोटर्सच्‍या इतिहासामधील एक आनंदाचा क्षण आहे, कारण आम्ही आमचा ५ दशलक्ष उत्पादनाचा टप्पा साजरा करत आहोत. प्रत्‍येक दशलक्षापासून पुढील दशलक्षापर्यंतच्‍या या प्रवासामधून चढ-उतार दिसण्‍यात आले आहेत. आम्‍ही प्रत्‍येक नवीन उत्‍पादनासह भारतात परिवर्तन घडवून आणत आहोत. प्रत्‍येक इनोव्‍हेशनमागे राष्‍ट्रनिर्मितीची संकल्‍पना होती. विविध नवीन तंत्रज्ञान आणण्‍यासाठी ग्राहकांनी ब्रॅण्‍डचा आदर केला आहे आणि आम्‍ही हे उल्‍लेखनीय यश शक्‍य केलेल्‍या आमच्‍या ग्राहकांचे त्‍यांनी दिलेल्‍या प्रचंड पाठिंब्‍यासाठी आभार मानतो, असे ते म्हणाले.

(हे ही वाचा : Maruti-Mahindra चा खेळ संपणार, टाटा आणतेय देशातील सर्वात सुरक्षित कार, सेफ्टीत तडजोड नाही!)

५-दशलक्ष उत्‍पादनाच्‍या सुवर्ण टप्‍प्‍याला साजरे करण्‍यासाठी टाटा मोटर्स भारतातील ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उत्‍सव मोहिम राबवणार आहे. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्स त्‍यांच्‍या डीलरशीप व विक्री आऊटलेट्सना ब्रॅण्‍डेड आऊटफिट्स व सिग्‍नेटरी चिन्‍हासह सजवून या सुवर्ण टप्‍प्‍याला साजरे करतील. कंपनी त्‍यांचे उत्‍पादन केंद्रे व प्रादेशिक कार्यालयांमध्‍ये महिनाभर साजरीकरण सुरू ठेवेल.

टाटा मोटर्सने २००४ मध्‍ये १ दशलक्ष उत्‍पादनाचा टप्‍पा संपादित केला, दुसरा दशलक्ष टप्‍पा २०१० मध्‍ये संपादित केला आणि २०१५ मध्‍ये ३ दशलक्ष उत्‍पादनाचा टप्‍पा गाठला, त्‍यानंतर २०२० मध्‍ये ४ दशलक्षावी कार लाँच केली. यामधून कंपनीचा प्रबळ उत्‍पादन पोर्टफोलिओ व वाढते ग्राहक संबंध दिसून येतात. टाटा मोटर्सने जागतिक ऑटोमोटिव्‍ह उद्योगावर मोठा परिणाम झालेला कोविड-१९ काळ आणि सेमीकंडक्‍टर कमतरतेचे संकट अतसाना देखील तीन वर्षांच्‍या आत ४ दशलक्ष कार्स ते ५ दशलक्ष कार्सपर्यंतचा टप्‍पा गाठला. १९९८ पासून टाटा मोटर्सने काही प्रतिष्ठित ब्रॅण्‍ड्स सादर केले आहेत, जे मंदीच्‍या काळात देखील टिकून राहिले आहेत, आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात मोटरिंग लँडस्केपला आकार देण्यात अविभाज्य भूमिका बजावली आहे आणि अजूनही भारतातील अनेक घरांमध्ये लोकप्रिय आहेत.

ऑफर्स आणि कार खरेदी पर्यायांबाबत अधिक माहितीसाठी तुमच्‍या जवळच्‍या डीलरशिपशी संपर्क साधा किंवा https://cars.tatamotors.com/ येथे भेट द्या.