scorecardresearch

Maruti-Mahindra चा खेळ संपणार, टाटा आणतेय देशातील सर्वात सुरक्षित कार, सेफ्टीत तडजोड नाही!

भारतीय ऑटो बाजारात सुरक्षित कारची मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून खरेदी होताना दिसत आहे. त्यातच आता टाटा मोटर्स आपल्या SUV ला आणखी सुरक्षित करणार आहे.

Tata Nexon facelift
Tata Nexon facelift आणखी सुरक्षित होणार (Photo-financialexpress)

TaTa Motors: टाटा मोटर्सच्या कार भारतीय बाजारात सर्वाधिक पसंत केल्या जातात. त्यातल्या त्यात टाटा मोटर्सच्या नेक्सानचा ग्राहकांमध्ये बोलबाला आहे. आता टाटा मोटर्स नेक्सॉनच्या फेसलिफ्ट आवृत्तीवर काम करत आहे. यासंबंधीचे फोटो वेबसाईटवर शेअर करण्यात आले आहेत. लाँचपूर्वीच यासंबंधीची माहिती समोर आली आहे. ADAS वैशिष्ट्य Nexon फेसलिफ्टमध्ये समाविष्ट केले जाईल. हे फीचर हॅरियर आणि सफारीमध्ये आधीच दिलेले आहे.

यात टाटा कर्व प्रमाणेच नवीन स्टीयरिंग व्हील मिळेल. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर समोर आणि मागील बाजूस एलईडी लाइट बार आणि नवीन अलॉय व्हील्स देखील मिळतील.

(हे ही वाचा : …म्हणून तुमच्या नवीन कारची डिलिव्हरी वेळेवर झाली नाही; ‘या’ कंपनीच्या SUV साठी ग्राहक रांगेत )

नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह १.५-लिटर डिझेल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. हे १२३bhp पॉवर आणि २२५Nm टॉर्क जनरेट करेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 15:21 IST