देशात वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढले आहेत. सुरक्षा उपाय न अवलंबल्याने अनेकांचा अपघातामध्ये जीव जातो. या वर्षी टाटा सन्सचे माजी चेअरमेन सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी सिटबेल्ट लावले नसल्याचे काही अहवलांतून समोर आले होते. सिट बेल्टचे महत्व अधोरेखित करणारी अजून एक घटना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा नेक्सन हे ५ स्टार सेफ्टी रेटिंग असलेले वाहन १२० किमी प्रति तास वेगात महामार्गावरून क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. नेक्सॉन ही टाटाची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही आहे. जीएनसीएपीमध्ये मिळालेली ५ स्टार सुरक्षा रेटिंग ही तिच्या वाढत्या लोकप्रियतेमागील एक कारण आहे. मात्र, १२० किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या या कारचा दणकटपणा देखील अपघातातून समोर आला आहे. अपघातानंतर तिचा चेहरा मोहराच बदलला आहे.

(सुवर्ण संधी! ह्युडाईच्या ‘या’ वाहनांवर मिळत आहे १ लाखांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर)

कसा घडला अपघात?

निखिल राणा यांनी युट्यूबवर या अपघाताबाबत माहिती दिली. अशा अपघातांबाबत माहिती टाकून राणा हे कार खरेदी करू इच्छित असलेल्या लोकांना उच्च सुरक्षा रेटिंग असलेली कार घेणे किती महत्वाचे आहे, याबाबत माहिती देतात. त्यांनी व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सॉनचा अपघात आसाममध्ये घडला. चालकाने सिटबेल्ट लावले नव्हते. नेक्सॉन १२० किमी प्रति तास वेगाने चालवली जात असल्याचे व्हिडिओतील छायाचित्रांतून दिसून येत आहे. परिणामी एसयूव्ही अनियंत्रित झाली आणि रोडखाली असलेल्या एका शेतात पडली.

धडक इतकी जबरदस्त होती की चालक वाहनातून बाहेर फेकला गेला. या अपघातात चालकाचे काय झाले याची माहिती मिळालेली नाही. मात्र, चालकाने सिटबेल्ट घातले नव्हते, असे व्हिडिओत सांगण्यात आले आहे. सिटबेल्ट न लावल्याने काय होते, हे या अपघातातून स्पष्टपणे दिसून येते. अपघातामुळे कारची स्थिती खूपच खराब दिसून येत आहे. या घटनेतून कार किती दणकट आहे हे देखील कळते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata nexon crashed at a 120 km speed check what happen to driver ssb