Citroen 7 Seater car: भारतात गेल्या काही वर्षांत सात सीटर कारची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. ज्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांचे नवीन मॉडेल्सही लाँच केले आहेत. यावर्षी सुद्धा आपल्याला अनेक नवीन SUV आणि MPV कार देशात पाहायला मिळतील. नवी ७ सीटर कार भारतीय बाजारात दाखल होणार आहे. फ्रेंच ऑटोमेकर Citroen भारतात Citroen C5, Citroen C3 आणि Citroen eC3 विकत आहे. कंपनीने आता क्रेटा, सेल्टोस, ग्रँड विटारा, Hyryder आणि Astor सारख्या कारशी स्पर्धा करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनी भारतात एका नवीन कारची चाचणी करत आहे, ज्याचे नाव Citroen C3 Plus असे असू शकते. हे कंपनीच्या Citroen C3 वर आधारित असेल आणि कदाचित ७-सीटर आणि ५-सीटर पर्याय मिळतील. चला जाणून घेऊया या कारची संपूर्ण माहिती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार कशी आहे खास?

लीक झालेल्या चित्रांवरून असे दिसून आले आहे की, याला C3 हॅचबॅकसारखेच डिझाइन मिळेल. सी-पिलरनंतर गाडी लांब करण्यात आली असली तरी, Citroen C3 Plus कॉम्पॅक्ट SUV ची लांबी सुमारे ४.२-४.३m असणे अपेक्षित आहे. याआधी लीक झालेल्या फोटोंमध्ये ही कार Kia Seltos च्या शेजारी पार्क केलेली दिसली होती, ज्याच्या आधारे लांबीचा अंदाज लावला जाऊ शकतो. या वाहनाची नुकतीच बिहारमधील भोजपूरमध्ये चाचणी करण्यात आली.

(हे ही वाचा: खरचं कार जास्त Wash केल्याने कारच्या पेंटचे नुकसान होते का? जाणून घ्या सविस्तर )

जरी आतील बाजूस, C3 हॅचबॅकपेक्षा खूपच वेगळा असेल. स्टीयरिंग व्हील आणि इतर स्विचगियर C3 सारखेच आहेत, परंतु डॅशबोर्डला पूर्णपणे नवीन डिझाइन मिळते. मध्यभागी क्वाड एसी व्हेंट्सऐवजी दोन मोठे एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. त्याची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील नवीन असेल.

सध्या, C3 हॅचबॅकमध्ये क्लायमेट कंट्रोल, अॅलॉय व्हील्स, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, डिमिंग IRVM, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रिअर वायपर आणि डिफॉगर यांसारखी वैशिष्ट्ये गायब आहेत. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ही वैशिष्ट्ये पाहता येतील. इंजिनमध्ये येत असताना, ११० Bhp आणि १९० Nm सह १.२L टर्बो-पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत ६-स्पीड एमटी गिअरबॉक्स मिळू शकतो. आशा आहे की, Citroen C3 Aircross (किंवा C3 Plus) ला एक स्वयंचलित पर्याय मिळाला पाहिजे. Citroen C3 SUV च्या किंमती १० लाख रुपयांपासून सुरू होऊन १५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लाँच होण्याची अपेक्षा आहे.

 

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The powertrain on this new citroen c3 based compact suv is likely to be similar to c3 hatchback a 1 2l turbo petrol unit pdb
First published on: 27-03-2023 at 11:37 IST