What To Do When Bike Does Not Start 3 easy steps that will start your vehicle immediately | Loksatta

What To Do When Bike Does Not Start: रस्त्यात बाईक बंद पडल्यास ‘या’ ३ गोष्टींनी झटक्यात करा सुरु

What To Do When Bike Does Not Start: आपण मित्रांसह किंवा आपल्या एखाद्या खास व्यक्तीसह मस्त बाईक घेऊन बाहेर पडले आहात आणि अचानक भर रस्त्यात तुमची गाडी बंदच पडली तर?

What To Do When Bike Does Not Start: रस्त्यात बाईक बंद पडल्यास ‘या’ ३ गोष्टींनी झटक्यात करा सुरु
What To Do When Bike Does Not Start: (सौजन्य : युट्यूबवरुन साभार)

What To Do When Bike Does Not Start: आपण मित्रांसह किंवा आपल्या एखाद्या खास व्यक्तीसह मस्त बाईक घेऊन बाहेर पडले आहात आणि अचानक भर रस्त्यात तुमची गाडी बंदच पडली तर? झाली ना विनाकारण सर्वांसमोर फजिती? बरं फजितीचं राहूद्या बाजूला पण अचानक गाडी बंद पडल्याने ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला होतं आणि वर चार लोकांची बोलणी खावी लागतात त्याच काय? अशा भररस्त्यात तुम्हला चटकन कुठे गॅरेज किंवा मेकॅनिक सापडण्याचीही शक्यता नसते. अशावेळी तीन सोप्या स्टेप्सवापरून आपण गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करू शकता. गाडी अचानक बंद पडण्यामागे नेमकं काय कारण आहे आणि त्यावर काय उपाय करावे हे आपण जाणून घेऊयात..

एयर फिल्टर स्वच्छ करा

तुमच्या व्हॅनच्या इंजिनमध्ये हवा जाताना त्यात कचरा अडकू नये यासाठी एअर फिल्टर लावलेले असतात. समजा बरेच दिवस आपण हे एअर फीटलर स्वच्छ केले नाही तर कचरा अडकून इंजिनपर्यंत हवा जाणेच बंद होते. त्यामुळे काही दिवसांच्या कालावधीने गाडीचे सर्व्हिसिंग करावे. मात्र समजा भर रस्त्यात वाहन बंद पडले असेल तर आपण एअर फिल्टर साफ करून गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करावा.

स्पार्क प्लगमध्ये कचरा

एखाद्या वेळेस तुमच्या बाईकचे एअर फिल्टर स्वच्छ असले तर स्पार्क प्लगमध्ये कचरा अडकलेला असू शकतो. गाडीचे नियमित सर्व्हिसिंग केल्यास असे त्रास सहसा होत नाहीत मात्र काही कारणाने आपण अनेक दिवस बाईक वापरली नसेल आणि मग अचानक सुरु केल्यावर ती मध्येच बंद होत असेल तर स्पार्क पेंग तपासून पाहावा. स्पार्क प्लग हा इंजिनाला लागून असलेल्या बांगड्यांसारख्या भागाने जोडलेला असतो जो फिरवून आपण प्लग काढून घेऊ शकता. प्लग स्वच्छ केल्यावर याच पद्धतीने त्याला पुन्हा जोडता येईल.

…जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट युरोपमध्ये कार चालवतात, Viral Photo पाहून नेटकरी म्हणतात वाह्ह!

इंजिनचे तापमान तपासा

अधिक वापराने किंवा सतत वेगाने बाईक चालविल्याने इंजिनचे तापमान वाढते यामुळे बाईक मध्येच बंद पडू शकतो. जर तुम्हाला असा अनुभव आला तर काही वेळ बाईक बंद ठेवा (शक्यतो सावलीत पार्किंग करा) आणि इंजिनचे तापमान पुन्हा स्थिर झाल्यावर मग पुन्हा प्रवास सुरु करू शकता.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दिवाळीला नवी गाडी घेणार आहात? बजेटमध्ये बसणाऱ्या टॉप पाच कार कोणत्या आहेत पाहा

संबंधित बातम्या

खुशखबर! ७० हजारांची ‘ही’ स्कूटर फक्त १५ हजारात होईल तुमची; जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री; ‘ही’ कार कंपनी ठरली देशात अव्वल!
रोहित शर्मा दिसला त्याच्या ३.५ कोटीच्या Lamborghini Urus कारसोबत; पहा फोटो
मस्तच! फक्त ७० हजार डाऊन पेमेंटवर खरेदी करा ‘ही’ जबरदस्त कार; किती भरावा लागेल ईएमआय?
केवळ २ लाखात खरेदी करा Hyundai i10, जाणून घ्या सविस्तर ऑफर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेह होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध
पुणे: कमी पटसंख्येच्या शाळा बंद नाही करण्यात येणार नाही; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची स्पष्टोक्ती
Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
तुमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? अनुपम खेर यांनी उत्तर देत सांगितला ‘खेर’चा इतिहास, म्हणाले, “गाढव…”