Yamaha Ray ZR 125 Fi Hybrid Street Rally: मागील अनेक वर्षांपासून यामाहा कंपनी उत्कृष्ट दर्ज्याच्या दुचाकींची निर्मिती करत आहे. ऑटो क्षेत्रामध्ये यामाहाने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांचा ग्राहक वर्ग देखील मोठा आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने स्कूटर रेंजमध्ये अपडेट केल्याची माहिती समोर आली आहे. अपडेट केलेल्या स्कूटर्समध्ये यामाहा रे झेडआप १२५ एफआय हायब्रिड स्ट्रीट रॅली या दमदार स्कूटरचा देखील समावेश आहे. जर तुम्ही स्कूटर घेण्याचा विचार करत आहात, तर यामाहा कंपनीची ही स्कूटर तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकते.

चला तर मग यामाहाच्या या स्कूटरची सविस्तर माहिती घेऊया…

यामाहा रे झेडआर १२५ एफआय हायब्रिड स्ट्रीट रॅली या स्कूटरच्या किंमत ९२.५३० रुपये (दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये) आहे. तर ऑन रोड या स्कूटरची किंमत १,०६,४४६ रुपये इतकी आहे. ऑन रोड किंमत देऊन ही स्कूटर विकत घेण्यासाठी किमान १ लाख रुपयांचे बजेट असणे आवश्यक आहे. फायनान्स प्लॅनच्या आधारे तुम्ही सुरुवातीला १५ हजार रुपये देऊन ही स्कूटर घरी आणू शकता. ऑनलाइन फायनान्स कॅल्युलेटरनुसार, ही यामाहा स्कूटर खरेदी करण्यासाठी कोणतीही बॅंक ग्राहकांना ९.७ टक्के वार्षिक व्याजदरावर ९१,४४६ रुपयांचे कर्ज देते. सुरुवातीला १५ हजार रुपये डाऊन पेमेंट देऊन मग सलग ३ वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला २,९३८ रुपये बॅंकेमध्ये भरावे लागतील.

यामाहाच्या या स्कूटरमध्ये १२५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे. एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित या इंजिनची पीएस पॉवर ८.२ आहे. तसेच इंजिन १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करु शकते. ही हायब्रिड स्कूटर एक लीटर पेट्रोलवर ७१.३३ किमी मायलेज देते असा यामाहा कंपनीने दावा केला आहे. ARAI द्वारे हे प्रमाणित देखील करण्यात आले आहे. या स्कूटरच्य़ा पुढच्या चाकावर डिस्क ब्रेक आणि मागील चाकावर ड्रम ब्रेक आहे. त्यासह स्कूटरमध्ये चांगली कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमही आहे.

आणखी वाचा – Car PDI: खरेदी केलेली गाडी घरी आणण्याआधी का दिला जातो पीडीआय करण्याचा सल्ला, जाणून घ्या खरं कारण

या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल ऑटोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, फ्यूल गॉज, पोजिशन लाइट, स्मार्ट मोटर जनरेटर सिस्टीम, स्टॉप अ‍ॅंड स्टार्ट सिस्टीम, साइड स्टॅंड इंजिन कट ऑफ स्विच असे अनेक फिचर्स आहेत. किंमत, मायजेल, फिचर्स सगळ्याच बाबतीमध्ये ही स्कूटर उत्तम आहे.