साहित्य :  रंगीत कागद, कात्री, जुनी रिफील, गम.
कृती : तुमच्या आवडत्या रंगीत कागदाच्या साधारण १ सें.मी. रुंदीच्या लांब-लांब पट्टय़ा कापून घ्या. जुन्या रिफीलच्या साहाय्याने एक-एक पट्टी गुंडाळून गोल बनवा. थोडासा हलका हात सोडून पट्टय़ांचे एका मापाचे गोल तयार करा व नीट चिकटवा. या गोलांना एका बाजूने चिमटीत धरून बोटांचा दाब देऊन पाण्याच्या थेंबाचा आकार करा. असे दोन एका रंगाचे आकार निमुळती बाजू खाली ठेवून गमच्या साहाय्याने चिकटवा. बघा किती नाजूक हृदयाचा आकार तयार झालाय नाही!
असेच आकार सध्याच्या लेटेस्ट फॅशनच्या टॅक पिन्सना लावून किंवा अन्य भेटवस्तूंची सजावट करता येईल.