कृती : आइस्क्रीमच्या ४ काडय़ा कापून घ्या. त्यांचे चपटे समान ८ भाग करा. डोळे पूर्णपणे झाकले जातील अशाप्रकारे या भागांच्या फ्रेम्स बनवा आणि त्या फे व्हिक्विकने चिकटवा. त्या वाळू द्या. आणखी दोन काडय़ांना साधारण माप घेऊन सारख्या अंतरावर खाचा बनवा. बनवलेल्या दोन्ही फ्रेम्स एका छोटय़ा पट्टीच्या तुकडय़ावर चिकटवा व अॅक्रिलिक रंगात रंगवून घ्या. पूर्णपणे वाळल्यावर
थ्रीडी आऊटलायनर्सने रंगवा, छान सुशोभित करा. मागील बाजूस रंगीत जिलेटिन पेपरचे तुकडे चिकटवा. खाचा केलेल्या काडय़ांनासुद्धा अॅक्रिलिक रंगात दोन्ही बाजूने रंगवा व वाळू द्या.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
आर्ट कॉर्नर : गंमत गॉगल
साहित्य : आइस्क्रीमच्या सहा काडय़ा, फेव्हिक्विक, कात्री, गम, जिलेटिन पेपर, अॅक्रॅलिक रंग, ब्रश, थ्रीडी आऊटलायनर्स इ.
First published on: 28-04-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art corner icecream sticks gogal