बालमित्रांनो, आपण सध्या उन्हाळ्याच्या सुटय़ा अनुभवत असाल. स्वच्छंदीपणे मनमुराद भटकणे, किल्ल्यांवर जाणे, रानातल्या झाडांवरून कैऱ्या, करवंदं, जांभळं अशा प्रकारची फळे स्वत: झाडावरून काढून आणून त्याचा आस्वाद घेणे अशा नाना प्रकारे आपण सुट्टीचा आनंद घेत असाल. परंतु हे करताना आपण
आपण खेळता खेळता कुठे तरी पडतो आणि जखम झाल्यास ती दाबून धरतो. तुमचे आई-बाबा लगेच त्यावर औषध लावतात व आपल्याला पटवून देतात की आता जखम बरी होईल. दोन-तीन दिवसांत आपल्याला त्याचा अनुभवही येतो. आपल्या जखमेतील रक्त थांबलेले असते. जखमेच्या जागी खपली आलेली असते व त्याचा रंगही बदललेला असतो. पुढे ती खपलीही पडून जाते व आपली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी होऊन जाते.
आता विचार करा, हे सर्व करायला आपल्याला हात-पाय दिलेले आहेत. आपली अडचण आपण आई-बाबांना सांगू शकतो. काहीही झाले तरी आपण वेगवेगळे उपचार घेऊ शकतो; परंतु अशीच जखम जर एखाद्या झाडाला झाली तर ते काय करेल हो? त्याच्याकडे उपचारासाठी तर आपल्यासारखी काहीच साधने उपलब्ध नाहीत. तेव्हा आपल्या मनात खरंच प्रश्न उभा राहतो. पण आपल्यापकी किती जणांच्या मनात आजवर
सर्वसाधारणपणे सगळ्याच झाडांमध्ये महत्त्वाचे वैशिष्टय़ असते ती त्या झाडाच्या संरक्षण क्षमतेची साधने. यासाठी झाडांची भिस्त असते ती त्यांच्या बाह्य भागातील विविध पेशींच्या उभ्या असलेल्या िभती. निसर्गात झाडाझुडपांवर चरणारे जीव सोडले तर अन्य सर्व जीव अत्यंत सूक्ष्म असे असतात व ते झाडांच्या आतमध्ये शिरण्याचा नेहमी प्रयत्न करतात. यामध्ये सूक्ष्म जीव, जिवाणू, विषाणू, अगदी छोटे किडे, बुरशी प्रकारातील प्रजाती इत्यादी जीवांचा समावेश असतो. या जीवांना झाडांच्या आतल्या भागात शिरण्याकरिता खूपच संघर्ष करावा लागतो. कारण प्रत्येक झाडाचे स्वत:चे असे वैशिष्टय़ असते, त्यामुळे त्यांना सहजासहजी झाडांच्या आतमध्ये प्रवेश मिळत नाही. झाडाला कोणतीही इजा झाली नसल्यास असा प्रवेश मिळणे फारच कठीण असते. कारण या झाडांचे सर्वात बाहेरील बाजूच्या पेशींच्या भित्तिका असतात त्या फारच टणक व कडक असतात. त्यामुळे बाहेरील सूक्ष्म जीव अशा पद्ध
-डॉ. राहुल मुंगीकर
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2015 रोजी प्रकाशित
वनस्पतींची संरक्षक आयुधे
बालमित्रांनो, आपण सध्या उन्हाळ्याच्या सुटय़ा अनुभवत असाल. स्वच्छंदीपणे मनमुराद भटकणे, किल्ल्यांवर जाणे, रानातल्या झाडांवरून कैऱ्या, करवंदं, जांभळं अशा प्रकारची फळे स्वत: झाडावरून काढून आणून त्याचा आस्वाद घेणे अशा नाना प्रकारे आपण सुट्टीचा आनंद घेत असाल.

First published on: 17-05-2015 at 12:06 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natures magic security tools of plants and trees