साहित्य : गुलाबी, हिरवा जाड कागद, कात्री, पेन्सिल, ड्रॉइंग पिन्स इ.
कृती : गुलाबी जाड कागदावर साधारण ४ इंच ७४ इंच व २ इंच ७ २ इंच चौकोनांमध्ये कागद ५ ते ६ वेळा दुमडून घ्या. या दुमडीवर साधारण पाण्याच्या थेंबाच्या आकारात लहान व मोठय़ा पाकळ्या पेन्सिलने काढा. सर्व दुमडी एकदम हातात धरून एकसारख्या पाकळ्या एका आकारात कापा. हिरव्या रंगाच्या कागदावर पाकळ्यांपेक्षा मोठय़ा आकाराचा गोल कापा. पाकळ्या शिरांच्या दिशेत दुमडून त्या उघडा. लहान पाकळ्या आत व मोठय़ा पाकळ्या बाहेरील बाजूस धरा व गोलाकाराच्या मध्य बाजूस ड्रॉइंग पिनमध्ये अडकवा व गोलाकारात सरकवा. अशाच प्रकारे पानसुद्धा जोडा व मागे एखादा जाड तुकडा चिकटवून घट्ट जोडा. झाले आपले कागदी कमळ तयार! आता सर्व पाकळ्यांची टोके वरील बाजूस दुमडा व पूर्ववत ठेवा. कुठल्याही पसरट ट्रेमध्ये, रांगोळीमध्ये सुशोभनासाठी वापरू शकता.