१) सण म्हटला की देवापुढे आणि दारासमोर ही
काढायलाच हवी —
२) जुळ्यांना म्हणतात —
३) साधु- संत येती घरा तोचि — दसरा
४) गप्प बसणे या अर्थी —
५) एकमेकांची उणीदुणी काढून केलेले भांडण —
६) कृत्रिम दातांची जोडी —
७) लहानसा फोड —
८) केळ्याची एक जात —
९) तांदूळ, भाजी धुणे इ. उपयोगाची विशिष्ट आकाराची बांबूची परडी, चाळणी —
१०) बारीक दोरी —
११) गवत, दूर्वा —
१२) कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे रोजच्या वापरातील नाव म्हणजे चुन्याची —
१३) फुलाचे दल —
१४) छपरावरून पडणारी पाण्याची धार —
१५) पसायदानातील ओवी : वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची —
१६) वटवाघुळाला — असेही म्हणतात.
१७) क्रिकेटचे बाळबोध मराठी नाव —
१८) फणसाची बी —
१९) दुग्ध व्यावसायिक —
२०) कागदाची सुरळी —
उत्तरे:-
१) रांगोळी २) आवळी-जावळी ३) दिवाळी ४)अळीमिळी गुपचिळी ५) उखाळी-पाखाळी ६) कवळी ७) पुटकुळी ८) राजेळी ९) रोवळी १०) सुतळी
११) हरळी १२) निवळी १३) पाकळी १४) पागोळी
१५) मांदियाळी १६) पाकोळी १७)चेंडू-फळी
१८) अठळी १९) गवळी २०) पुंगळी.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2014 रोजी प्रकाशित
डोकॅलिटी
बालमित्रांनो, ‘ळ’ या अक्षरापासून शब्दांची सुरुवात होत नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे. अशी गोष्ट सांगितली जाते की, काव्यामध्ये ‘ळ’ हे अक्षर फारसे वापरले जात नाही, असा शेरा एका मान्यवरांनी
First published on: 15-06-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quiz series for kids