सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (बीओबी) सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत ४,८०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. बाकीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ८ टक्क्यांनी घट घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत बँकेने ५,२३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.गेल्या वर्षीच्या याच कालावधीत बँकेचे एकूण उत्पन्न ३५,४४५ कोटी रुपयांवरून दुसऱ्या तिमाहीत ३५,०२६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र, व्याज उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ३०,२७८ कोटी रुपयांवरून ३१,५११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) किरकोळ वाढ होऊन ११,९५४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या ११,६३७ कोटी रुपये होते.मत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत, बँकेची एकूण अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस २.१६ टक्क्यांपर्यंत कमी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत २.५० टक्के होती. तसेच, निव्वळ एनपीए ०.५७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, जे सप्टेंबर २०२४ च्या अखेरीस ०.६ टक्के होते.
परिणामी, तरतूद गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत २,३३६ कोटी रुपयांवरून १,२३२ कोटी रुपयांपर्यंत कमी केली आहे. भांडवल पर्याप्ततेच्या बाबतीत, भांडवल ते जोखीम-भारित मालमत्ता प्रमाण (सीआरएआर) १६.२६ टक्क्यांवरून १६.५४ टक्क्यांवर पोहोचले.
