Premium

सिस्टीम अपग्रेडमुळे ‘या’ बँकेच्या सेवा दोन दिवस बंद राहणार, जाणून घ्या वेळ अन् तारीख

Due to system upgrade : आम्ही आमच्या सिस्टीमच्या देखभाल आणि अपग्रेडसाठी आमच्या काही सेवा तात्पुरत्या निलंबित करणार आहोत. या प्रणालीची देखभाल आणि सुधारणा करण्याचे काम पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत केले जाणार आहे.

two services close of HDFC Bank
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

सिस्टम देखभाल आणि अपग्रेडमुळे काही सेवा बंद राहतील, अशी माहिती एचडीएफसी बँकेच्या वतीने ग्राहकांना इमेलद्वारे देण्यात आली आहे. बँकेने आपल्या सेवा सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एचडीएफसी बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या मेलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना चांगली बँकिंग सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे लिहिले होते. आम्ही आमच्या सिस्टीमच्या देखभाल आणि अपग्रेडसाठी आमच्या काही सेवा तात्पुरत्या निलंबित करणार आहोत. या प्रणालीची देखभाल आणि सुधारणा करण्याचे काम पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत केले जाणार आहे. यावेळी बँकिंग सेवा साधारणपणे कमी वापरल्या जातात, असंही एचडीएफसी बँकेनं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या सेवा बंद राहतील?

बँकेने केलेल्या मेलनुसार, शिल्लक तपासणी (बॅलन्स चेक करणे), ठेव, निधी हस्तांतरण आणि इतर पेमेंटशी संबंधित सेवा १० जून आणि १८ जून रोजी बंद राहतील. बँकेने सिस्टम अपग्रेडसाठी ४ जून रोजी सकाळी ३ ते ६ दरम्यान बँकिंग सेवा बंद ठेवल्या होत्या. डाऊनटाइम कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असंही बँकेकडून मेलमध्ये सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to system upgrade two services of hdfc bank will be closed know the time and date vrd