EPFO Latest Updates:कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत हायर पेन्शनसाठी अर्ज करण्यांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. ईपीएफओने हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी पात्र सदस्यांना हायर पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी ३ मार्च २०२३ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता पात्र सदस्य रिटायरमेंट फंड बॉडी एंप्लॉयीड प्रोव्हिडेंट फंड ऑर्गेनायझेशन (EPFO) युनिफाइड मेंबर्स पोर्टलद्वारे ३ मेपर्यंत आपला अर्ज सादर करु शकतात. यासाठी EPFO युनिफाइड मेंबर्स पोर्टलची URL नुकतीच अ‍ॅटिव्ह करण्यात आली आहे. ज्यात सदस्यांना हायर पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी ३ मेपर्यंतची तारीख निश्चित केल्याचे दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले होते की, EPFO ​​ला सर्व पात्र सदस्यांना हायर पेन्शनची निवड करण्यासाठी ४ महिन्यांचा वेळ द्यावा लागेल. हा ४ महिन्यांचा कालावधी ४ मार्च २०२३ रोजी संपत आहे. यात पात्र सदस्यांना हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ मार्च २०२३ पर्यंत होती. दरम्यान गेल्या आठवड्यात EPFO ​​ने आपल्या प्रक्रियेचा तपशील जारी केला. ज्यात असे सांगण्यात आले की, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना (EPS) अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही संयुक्त अर्ज करावा लागणार आहे.

हायर पेन्शन म्हणजे नेमकं काय?

कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत १५,००० रुपयांपर्यंतच्या पगारानुसार पेन्शनमधील रक्कम निश्चित केली जाते. म्हणजे मूळ पगार जरी ५०,००० रुपये झाला तरीही EPS मधील योगदान केवळ १५,००० रुपयांवरून निश्चित केले जाईल, यामुळे ईपीएसमध्ये खूप कमी पैसे जमा करता येतात. म्हणजेच पेन्शन जमा करता येते. पण आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

अंतिम मुदत वाढवल्याने काय फायदा होणार?

ईपीएफओच्या हायर पेन्शन अर्ज करण्यासाठी बरीच कागदपत्र जमा करावी लागतात. यामुळे ३ मार्च २०२२ पर्यंत अंतिम मुदत असल्याने काही पात्र कर्मचाऱ्यांना ही कागदपत्र जमा करण्यात अडचणी येत होत्या, मात्र मुदत वाढविल्याने त्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.

यासाठी संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे?

हायर पेन्शनसाठी पात्र EPS सदस्याला जवळच्या EPFO कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागेल, यावेळी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. प्रमाणीकरणासाठीच्या अर्जात मागील सरकारी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आदेशानुसार डिस्क्लेमर असं गरजेचं आहे. या अर्जाचा डेटा डिजिटल असेल आणि अर्ज दिल्यानंतर अर्जदाराला एक पावती क्रमांक दिला जाईल.

हायर पेन्शनसाठी आलेल्या अर्जांची तपासणी करून संबंधीत अर्जदारांना जो काही निर्णय असेल तो ई-मेल किंवा पोस्ट आणि एसएमएसद्वारे कळविला जाईल. EPFO च्या आदेशानुसार, एखाद्या सदस्याला जॉइंट ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आणि पेन्शन रकमेबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी EPFIGMS या पोर्टलवर तक्रार करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo extends deadline to opt for higher pension to may 3 read all details sjr