EPF Monthly Share Employee Employer : EPFO ही भारत सरकारची एक संस्था आहे, जी कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी योजना चालवते. या योजनेनुसार कर्मचारी आणि त्यांचे नियोक्ते (कंपनी) दोघेही कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के दराने निधीत योगदान देतात, जो कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का? पीएफमध्ये तुमचा आणि कंपनीचा किती हिस्सा असतो? चला तर मग या बातमीतून जाणून घेऊ…
ईपीएफओच्या अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या तीन योजना असतात. त्यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना (EPS), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना (EPF) व कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजना (EDLI) यांचा समावेश असतो .
तर, कर्मचारी म्हणून तुमचे पीएफ योगदान दोन भागांत विभागले जातात, ते पुढीलप्रमाणे… (How To Calculate Your Employers EPF Contribution)
१. कर्मचाऱ्याचे ईपीएफ योगदान – कर्मचाऱ्याच्या पगारातील १२ टक्के रक्कम दर महिन्याला पीएफ खात्यात जमा केली जाते.
२. कंपनीचे (नियोक्त्या किंवा मालक) पीएफ योगदान – त्या कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात कंपनी किंवा नियोक्त्याकडूनही तितकीच रक्कम स्वतंत्रपणे जमा जाते.
तर ही १२ टक्के रक्कम खालील प्रकारे विभागली जाते आणि नंतर ती तुमच्या ईपीएफ खात्यात जमा होते.
- कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या पीएफ योगदानातील ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाईल.
- ८.३३% रक्कम ईपीएस कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) जमा होईल.
- ०.५०% रक्कम एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्समध्ये जाईल.
- १.१०% ईपीएफ (EPF) मध्ये समाविष्ट केली जाईल.
- ०.०१% डिपॉझिट लिंक्ड विमा योजनेत (EDLIS) जाईल.
आतापर्यंत सांगितलेल्या माहितीवरून तुम्हाला ईपीएफचे विविध विभाग आता माहीत झाले असतील.
ईपीएफवरील व्याज कसे मोजले जाते? (How Interest On EPF Calculated)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफवरील व्याज प्रत्येक महिन्याला मोजले जाते. पण, वर्षाच्या अखेरीस खात्यावर जमा केले जाते. वार्षिक व्याजदर १२ ने भागून लागू मासिक दर निश्चित केला जातो. उदाहरणार्थ, जर व्याजदर ८.५% वार्षिक असेल, तर मासिक दर ०.७१२५% होईल.
उदाहरणार्थ – जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार १५ हजार रुपये आहे. तर कर्मचारी पगारातील १२ टक्के म्हणजे १,८०० रुपये जमा करतो. तर कंपनी ३.६७ टक्के म्हणजे ५५० रुपये जमा करतो. म्हणजे एकूण पीएफमध्ये २,३५० रुपये जमा होतात. ०.७१२५% मासिक व्याजदर लागू केल्यास, त्या महिन्यासाठी जमा होणारे व्याज १६.७५ रुपये होईल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी पात्रता काय असते? (Employee Provident Fund Eligibility)
ईपीएफ योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या…
- तुम्ही २० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत नोकरी करीत असणे गरजेचे.
- तुमचे वय १८ ते ५४ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
- तुमचा पगार १५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
ईपीएफओची उद्दिष्टे काय? (Objectives OF EPFO)
- प्रत्येक कर्मचाऱ्याचे एकच ईपीएफ खाते असेल याची काळजी घेणे.
- नियमांचे पालन करण्याची पद्धत सोपी बनवणे.
- ईपीएफओने घालून दिलेले नियम आणि अटींचे पालन केले जाईल याची खात्री करणे.
- ऑनलाइन सेवांबद्दल विश्वास वाढवणे आणि त्या सेवांमध्ये सुधारणा करीत राहणे.
- सर्व सदस्यांना त्यांच्या खात्याचा ऑनलाइन ॲक्सेस सहजपणे उपलब्ध करून देणे.
- दाव्याचा निपटारा करण्याच्या वेळेत २० दिवसांवरून तीन दिवसांपर्यंत घट करणे.
पीएफशी संबंधित तक्रार करता येते का? (How to File a Complaint for EPF Related problems )
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)कडून सदस्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर यंत्रणेची सोय करण्यात आली आहे. सदस्य त्यांचे ईपीएफ खाते, सेटलमेंट्स, रक्कम काढणे किंवा हस्तांतरित करणे यांसारख्या कामांसाठी ईपीएफ ग्रिव्हन्स सिस्टीमच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. त्याद्वारे सदस्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण केले जाते.
तुमची तक्रार दाखल करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा (How do I complain about an EPF grievance)
- पहिल्यांदा ईपीएफ मेंबर वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर ग्रिव्हन्स सेक्शनच्या तक्रार विभागाला भेट द्या.
- तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट क्रमांक (यूएएन) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- त्यानंतर तुमच्या तक्रारीचा प्रकार निवडा. जसे की – पैसे काढणे, सेटलमेंट किंवा अकाउंट डिटेल्स
- यानंतर संबंधित आवश्यक माहिती द्या आणि त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तिथे अपलोड करा.
- त्यानंतर तक्रार सबमिट करा आणि त्यानंतर युनिक रजिस्ट्रेशन नंबर लिहून घ्या.
- हा युनिक रजिस्ट्रेशन नंबर वापरून, तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती तपासू शकता.
- एक नियुक्त अधिकारी तुमच्या तक्रारीची पडताळणी करेल.
- तुम्हाला त्याच्या अपडेट्स तुमच्या एसएमएस किंवा मेलवर मिळत राहतील.
- जर तुमची तक्रार सोडवली गेली नाही तर तम्ही पुन्हा पोर्टलवर तक्रार करू शकता.
- सामान्यतः तुमची अडचण १५ ते ३० दिवसांच्या आत सोडवली जाते.
- जर तुम्हाला तुमच्या तक्रारीसंदर्भात आणखी माहिती हवी असेल, तर तुम्ही ईपीएफ ग्रिव्हन्सला भेट देऊन, त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता.