Gold Silver Price Today : जगभरातील विविध घटना-घडामोडींचा परिणाम आर्थिक घडामोडींवर होताना दिसत आहे. एकीकडे भारत-पाकिस्तान तणाव तर दुसरीकडे अमेरिका-चीनमधील व्यापार वाटाघाटीमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठे बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. यात आज गुरुवारी, १५ मे रोजीदेखील सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवानुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर २,३७५ रुपयांनी घसरून ९१, ४८४ रुपये झाला आहे. काल हाच दर ९३,८५९ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
तर यापूर्वी एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने ९९,१०० रुपयांचा उच्चांक गाठला होता आणि मार्चमध्ये चांदीच्या दराने एक लाख ९३४ हजारांचा टप्पा पार केला होता. आज चांदीची किंमत २,२९७ रुपयांनी कमी होऊन ९४,१०३ रुपयांवर आली आहे. आज एक किलो चांदीची किंमत ९६,४०० रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचा दर जाणून घ्या
मुंबईत २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ८६,१०० रुपये आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९३,९३० रुपये आहे.
दिल्लीत आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ८६,२५० रुपये आहे, तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९४,०८० रुपये आहे.
कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८६,१०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९३,९३० रुपये आहे.
चेन्नईमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ८६,१०० रुपये आणि २४ कॅरेट १० ग्रॅमची सोन्याची किंमत ९३,९३० रुपये आहे.
सोन्याचा दर नेमका कसा बदलला?
आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. किमतीतील घसरणीमुळे एका महिन्यात सोनं नीचांकी पातळीवर आलं आहे. मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान सोन्याचा दराने एक लाखांपर्यंतचा टप्पा पार केला होता. मात्र, हा दर आता ५,००० रुपयांनी घसरला आहे.