Today’s Gold Silver Rate : येत्या ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक आवडीने सोने खरेदी करतात. तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच सोने बुक करा कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अक्षय तृतीयाला दहा ग्रॅम २४ कॅरेट सोने १ लाखाचा आकडा पार करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,९०० रुपये तर चांदीचा दर ९५,७८० रुपये किलो आहे. सोने चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे दिसत आहे.

सोने चांदीचे दर (Gold silver rate today)

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ८७,९०८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ९५,९०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९५८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९५,७८० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

एक महिन्यापूर्वी सोन्याचा दर

गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर झपाट्याने वाढलेले दिसून आले. एक महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१४० रुपये होता तर आताची आकडेवारी पाहता सोने जवळपास ७.५८ टक्क्यांनी वाढले आहे. सोने साडेसहा हजाराने वाढले आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,८०८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,७९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,८०८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७९० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,८०८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७९० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,८०८ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७९० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver price hike today 17 april 2025 check gold silver rates in mumbai pune thane delhi kolkata ndj