मुंबई : महाकाय तंत्रज्ञान कंपनी गूगल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कंपनी असलेल्या रिलायन्स इंटेलिजेंसने धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्या मिळून भारतात कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर आणि प्रसार वेगाने वाढवणार आहेत. या भागीदारीअंतर्गत जिओ ग्राहकांना ३५,१०० रुपये मूल्याच्या गूगल एआय प्रो सेवांचा १८ महिन्यांसाठी विनामूल्य लाभ मिळणार आहे.

या योजनेंतर्गत वापरकर्त्यांना गूगल जेमिनी २.५ प्रो, अत्याधुनिक नॅनो बनाना आणि व्हिओ ३.१ चा वापर करता येणार असून उच्च दर्जाच्या प्रतिमा आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत होणार आहे. याबरोबरच गूगल फोटो, जीमेल, व्हॉट्सअॅप चॅट्सचा बॅकअपसाठी ड्राइव्हवर २ टीबी क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. सुरुवातीला ही सुविधा १८ ते २५ वयोगटातील जिओ ग्राहकांसाठी खुली राहणार आहे. पुढील टप्प्यात सर्व जिओ वापरकर्त्यांना उपलब्ध होईल.

देशातील १४५ कोटी लोकांना एआय सेवा देण्याचे आमचे लक्ष्य आहे. असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले. तर रिलायन्स आमच्यासाठी भारताच्या डिजिटल भविष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. आता ही भागीदारी एआयच्या नव्या युगात घेऊन जात आहोत, गूगल आणि अल्फाबेटचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई म्हणाले.

जिओ ग्राहकांना १८ महिन्यांपर्यंत मिळणार Google AI Proचा मोफत ऍक्सेस

काय मिळणार?

  • गूगलकडून जिओ वापरकर्त्यांना भेट — ₹३५,१०० किमतीचा Google AI Pro पूर्णपणे मोफत
  • 2 TB क्लाउड स्टोरेजसह Google Gemini 2.5 Proचा ऍक्सेस
  • नवीनतम Nano Banana, Veo 3.1 आणि Notebook LMचे विस्तारित वापराचे अधिकार
  • रिलायन्स आणि गूगलमिळून भारतातील AI क्रांतीला देणार नवी गती
  • Tensor Processing Unit मुळे भारतीय उद्योग मोठे आणि गुंतागुंतीचे AI मॉडेल्स विकसित करू शकतील
  • कंपन्यांना मिळणार प्रगत AI हार्डवेअरची सुविधा, Gemini Enterpriseवर तयार होतील नवे AI एजंट्स