Premium

विश्लेषणः तातडीच्या वेळेस जलद व्यवहार करण्यासाठी आरबीआयकडून नवी प्रणाली; UPI, NEFT, RTGS पेक्षा किती वेगळी?

तातडीच्या वेळेत जलद व्यवहार करणारी ही प्रणाली किमान हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर ऑपरेट करणे अपेक्षित असून, ती फक्त “गरजेच्या आधारावर” सक्रिय केली जाणार असल्याचंही RBI च्या अहवालात म्हटले आहे.

RBI lightweight payments system

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने तातडीच्या वेळेस जलद व्यवहार होण्यासाठी (lightweight payments system) पेमेंट आणि सेटलमेंट प्रणालीची संकल्पना तयार केली आहे. ही प्रणाली डिजिटल पेमेंट्सला समतुल्य असून, तिला “बंकर” म्हणतात, जी नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अगदी कमीत कमी कर्मचार्‍यांद्वारे कुठूनही चालविली जाऊ शकते. या प्रणालीची पायाभूत सुविधा UPI, NEFT आणि RTGS यांसारख्या विद्यमान पेमेंट प्रणालींना अधोरेखित करणाऱ्या तंत्रज्ञानापासून वेगळी असते. परंतु मध्यवर्ती बँकेने अद्याप ही पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी वेळ निश्चित केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तातडीच्या वेळेस जलद व्यवहार होण्याच्या प्रणालीची आवश्यकता का?

मंगळवारी (३० मे) रोजी २०२२-२३ च्या वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. तातडीच्या वेळेत जलद व्यवहार करणारी ही प्रणाली किमान हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर ऑपरेट करणे अपेक्षित असून, ती फक्त “गरजेच्या आधारावर” सक्रिय केली जाणार असल्याचंही RBI च्या अहवालात म्हटले आहे. सरकार आणि बाजाराशी संबंधित व्यवहारांसारख्या अर्थव्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे असे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ती उपयुक्त ठरणार असल्याचंही आरबीआयनं अधोरेखित केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 11:31 IST
Next Story
चलनातील नोटांमध्ये निरंतर वाढ