मुंबई: निकषांची पूर्तता करू न शकल्यामुळे रिझर्व्ह बँकेचे जना स्मॉल फायनान्सचा परिपूर्ण बँकेचा दर्जा मिळविण्यासंबधीचा अर्ज माघारी पाठविला आहे. बँकेने स्वेच्छेने परिपूर्ण बँक म्हणून संक्रमणासाठी अर्ज केला होता.

जना स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कंवल यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी उशिरा मिळालेल्या पत्रव्यवहारात, या वर्षी जूनमध्ये केलेला परिपूर्ण बँकेचा दर्जा प्राप्त कारण्यासंबधीचा अर्ज रिझर्व्ह बँकेने परत केला आहे. पत्रामध्ये अर्ज माघारी पाठविण्याबाबत नेमकी कारणे स्पष्ट केलेली नाहीत.

जना स्मॉल बँकेकडून अर्जाबाबत सर्व निकषांची पूर्तता येत्या काळात केली जाईल. त्यामुळे हा रिझर्व्ह बँकेचा नकार नसून आम्ही पुन्हा प्रयत्न करू, असे बँकेने सांगितले. विद्यमान आठवड्याच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी परिपूर्ण बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी अर्ज परत करण्यासंबंधी चर्चा करतील आणि नंतर अर्ज करण्यापूर्वी दुरुस्ती केली जाईल. जना स्मॉल बँकेने स्वेच्छेने परिपूर्ण बँक म्हणून संक्रमणासाठी अर्ज केला होता, असे कंवल यांनी सांगितले.