नवी दिल्ली : निवृत्तिवेतन नियामक मंडळाच्या (पीएफआरडीए) अध्यक्षपदाची धुरा सुब्रह्मण्यम रमण यांनी शुक्रवारी स्वीकारली.
केंद्र सरकारने ८ एप्रिलला रमण यांची पीएफआरडीएच्या अध्यक्षपदी पाच वर्षांसाठी नियुक्ती केली. त्यांच्या वयाच्या ६५ वर्षांपर्यंत ही नियुक्ती असणार आहे. भारतील लेखापरीक्षण व लेखा सेवेच्या (आयएअँडएएस) १९९१ च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत.
पीएफआरडीएमध्ये रूजू होण्याआधी त्यांनी उपमहालेखापाल आणि महालेखापाल कार्यालयाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेसचे मुख्याधिकारी, झारखंडचे प्रधान महालेखापाल या पदावरी रमण यांनी काम केले आहे.
ते २००६ ते २०१३ या कालावधीत भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीचे मुख्य सरव्यवस्थापक आणि नंतर कार्यकारी संचालक होते.
