टाटा रियल्टीच्या इंटेलियन ऑफिसने नवीन आयटी धोरण आणि महाराष्ट्रातील तंत्रज्ञान विकास आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मागणीवर त्याच्या संभाव्य प्रभावाबाबत सखोल पॅनल चर्चेचे आयोजन केले होते. “आयटी रिसर्जन्स, महाराष्ट्र” हा कार्यक्रम मुंबईतील बीकेसीमधील एक प्रतिष्ठित हॉटेलमध्ये नुकताच पार पडला. महाराष्ट्रात तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मागणी वाढवण्यासाठी नवीन आयटी धोरणाच्या परिवर्तनकारी क्षमतांवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमात सरकार, स्थावर मालमत्ता क्षेत्र आणि आयटी कंपन्यांच्या प्रमुख हितधारकांना एकत्र आणले गेले होते.

या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर म्हणून रॉयल इन्स्टिट्यूशनल ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स (आरआयसीएस) यांनी चर्चेची गुणवत्ता व सखोलता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्यक्रमात अनेक दिग्गज स्थावर मालमत्ता विकासकांनी भाग घेतला आणि “न्यू आयटी पॉलिसी अँड अ वर्ल्ड ऑफ पॉसिबिलिटीज फॉर महाराष्ट्र” या पहिल्या पॅनल चर्चेत आपले विचार मांडले. पॅनलचे अध्यक्षस्थान टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी व सीईओ संजय दत्त यांनी भूषवले. स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित यामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये हिरानंदानी समूहाचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. निरंजन हिरानंदानी, के रहेजा कॉर्पचे संचालक विनोद रोहिरा, पंचशील रियल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया, ऍक्टिसचे व्यवस्थापकीय संचालक आशिष सिंह आणि पी जी राठोड यांचा समावेश होता. या तज्ज्ञांनी नवीन आयटी धोरणामध्ये प्रस्तुत करण्यात आलेल्या संधी आणि आव्हानांविषयी चर्चा केली. नवीन तंत्रज्ञान व सध्याच्या कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढवण्याबाबत माहिती दिली. आयटी धोरणामध्ये ३५ लाख नोकऱ्यांच्या संधी निर्माण करत ९५००० कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय हे धोरण स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट, रेंटल एक्सपेंडिचर, वीजबिल आणि संपत्ती करामध्ये सूट यासारखी प्रोत्साहने देणेदेखील शक्य आहे.

हेही वाचाः RBI ची मोठी कारवाई, कोटक महिंद्रा बँकेसह ‘या’ मोठ्या खासगी बँकेला ठोठावला ‘इतक्या’ कोटींचा दंड

पॅनल चर्चेचे शीर्षक “महाराष्ट्र रिएल इस्टेट – रेडी फॉर द टेक सर्ज” हे होते. यामध्ये मुंबई आणि पुण्याची देशातील इतर आघाडीच्या बाजारपेठांसोबत तुलना करत स्थावर मालमत्ता बाजारपेठेविषयी एक व्यापक दृष्टिकोन प्रस्तुत केला गेला. या चर्चांमधून उपस्थितांना गुंतवणुकीच्या संधी आणि संभाव्य विकास क्षेत्रांबाबत एक माहितीपूर्ण दृष्टिकोन मिळाला. आयटी धोरण डेव्हलपर्सना आपल्या प्रकल्प साईट्सची निवड करताना अधिक लवचिकतेबरोबरीनेच कोणत्याही झोनमध्ये विकासाची अनुमती देते. उपक्रमाच्या आयोजनाचे यश आणि त्यामध्ये भाग घेऊन दिली गेलेली माहिती याबाबत टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय दत्त यांनी सांगितले, “आयटी रिसर्जन्स महाराष्ट्र हा उपक्रम ज्ञानाची देवाणघेवाण आणि उद्योगक्षेत्रात सहयोगाप्रति आमची बांधिलकी दर्शवतो. आम्ही परिवर्तित महाराष्ट्राचा मार्ग खुला करून देत आहोत आणि नवे आयटी धोरण या क्षेत्रात नावीन्य आणि विकास आणत कॉर्पोरेट रियल इस्टेट कंपन्यांसाठी संधींचे विश्व खुले करून दिले आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचाः खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट, बोनस केला जाहीर

आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध भविष्याला आकार देण्यासाठी सरकार आणि उद्योगक्षेत्रातील नेत्यांसमवेत हातमिळवणी करून या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी उत्सुक आहोत.” आयटी रिसर्जन्स महाराष्ट्र हा उपक्रम अतिशय यशस्वी झाला. या उपक्रमाने महाराष्ट्रात तंत्रज्ञान व स्थावर मालमत्ता क्षेत्रात विकसित होत असलेल्या लँडस्केपबाबत माहिती मिळवण्यासाठी उद्योगक्षेत्रातील दिग्गज, तज्ज्ञ आणि व्यावसायिकांना एकत्र आणले. हा उपक्रम माहितीपूर्ण चर्चा आणि हाय-प्रोफाइल व्यक्तींच्या सहभागासह उद्योगक्षेत्रामध्ये माहितीची देवाणघेवाण आणि सहयोग यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या बांधिलकीचे प्रमाण ठरला आहे.